Air fare hike: पुढील काही महिन्यांत देशात मोठे सण आणि उत्सव आहेत. या काळात प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. स्वस्तात तिकीट मिळावे म्हणून काही महिने आधीपासूनच बुकिंग सुरू होते. दरम्यान, येत्या काही दिवसांत विमान प्रवास महागण्याची शक्यता आहे. जेट फ्युअल (Aviation turbine fuel- ATF) निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी इंधन दरात 14% वाढ केली आहे.
सलग तीन महिने दरवाढ
विमान इंधनाचे दर मागील तीन महिन्यात तीनवेळा वाढवण्यात आले आहेत. पुढील काही दिवसांत गणेशोत्सव, त्यानंतर नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे मोठे सण आहेत. तसेच ख्रिसमस आणि नववर्षासाठीही विमान प्रवासात मोठी वाढ होते. या कालावधीत फ्लाइट्स गजबजलेल्या असतात. बस, रेल्वेसह विमान वाहतूकही तेजीत असते. मागील तीन महिन्यात जेट फ्युअलच्या किंमती 24 टक्क्यांनी वाढल्या आहेत.
कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ
1 सप्टेंबरला इंधन कंपन्यांनी दरवाढ केल्याने 20,295 रुपयांनी दर वाढून 1.12 लाख किलो लीटरवर पोहचला आहे. (Aviation turbine fuel price) प्रत्येक राज्यातील कर रचनेनुसार दर कमीजास्त असू शकतात. मात्र, दरवाढ सगळीकडे दिसून येऊ शकते. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना जेट फ्युअलच्या किंमतीही वाढल्या आहेत.
हवाई वाहतूक क्षेत्र पुन्हा अडचणीत येणार
कोरोना काळात हवाई वाहतूक क्षेत्र डबघाईला आले होते. मात्र, त्यानंतर सेवा क्षेत्रात प्रगती होऊ लागल्याने विमान वाहतूकही सुरूळीत झाली आहे. (Air ticket hike) मात्र, तीव्र, स्पर्धा, इंधन दरवाढ आणि व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवरील वाढत्या खर्चामुळे अनेक विमान कंपन्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. गो फर्स्ट एअरलाइन्स दिवाळखोरीत निघाली. वाढत्या इंधनदरामुळे कंपन्यांमध्ये आणखी स्पर्धा वाढत आहे.
LPG गॅस आयातीवरील सेस रद्द
दिल्लीमध्ये जेट फ्युअल 1,12,419.33 प्रति किलोलीटर वर पोहोचले आहे. तर कोलकात्यात 1,21,063.83 आणि मुंबईत 1,05,222 किलो लीटरवर दर पोहचले आहेत. दरम्यान, सरकारने घरगुती LPG गॅसच्या किंमती 200 रुपयांनी कमी केल्या आहेत. तसेच आयात होणाऱ्या LPG गॅसवरील 15% कृषी आणि इन्फ्रा सेस कर रद्द केला आहे.