Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Investing via ChatGPT: शेअर बाजारातील गुंतवणुकीचे सल्ले ChatGPT कडून; AI ची मदत आर्थिक नियोजन करताना कशी होते

Investing via ChatGPT

Image Source : Investing via ChatGPT

AI चॅटबॉट्सचा शिरकाव आर्थिक क्षेत्रातही झाला आहे. गुंतवणूक सल्ला, स्टॉक विश्लेषण, क्लिष्ट आकडेवारीचा अभ्यास करून सोपे ग्राफ तयार करणे, अशी अनेक कामे ChatGPT आणि इतर AI tool कडून करण्यात येतील. सध्या हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत असले तरी येत्या काळात पर्सनल फायनान्स हाताळताना चॅटजीपीटी सारखी टूल्स तुमच्या मदतीला येतील.

Investment thought AI bot: कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे तयार करण्यात आलेली टूल्स ज्यांना आपण AI मॉडेल्सही म्हणू शकतो. येत्या काळात ही टूल्स प्रत्येक क्षेत्रात धुमाकूळ घालतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. रेझ्युमे लिहून देणं, मेल पाठवणं, टुर प्लॅनिंगसह हजारो गोष्टी चॅटबॉट करू शकतो. भारतात ChatGPT tool चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. येत्या काळात शेअर मार्केट गुंतवणूक, म्युच्युअल फंड, बँकेकडून कर्ज घेण्याची प्रक्रिया आणि वैयक्तिक आर्थिक नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता नागरिकांना मदत करेल. 

गुंतवणूक, स्टॉक विश्लेषण, रिसर्च या कामांसाठी AI ची मदत घेणं सुरू झाली आहे. सध्यातरी हे तंत्रज्ञान बाल्यावस्थेत आहे. मात्र, भविष्यात तुमचं आर्थिक नियोजन AI करू शकते. आर्थिक सल्लागार, फायनान्शिअर अॅनालिस्ट यासह अनेकांचे जॉबही धोक्यात येतील, ऑटोमेशन वाढेल. 

गुंतवणूक चॅटबॉटद्वारे करता येईल का? 

एखाद्या शेअर्सचे विश्लेषण, म्युच्युअल फंड अॅनालिसिस, सल्ला, कोणत्या बँकेचे कर्ज घ्यावे याचा निर्णय, फायनान्शिअल अॅनलिस्टची दैनंदिन कामे, वैयक्तिक गरजा (कस्टमाइज) ओळखून गुंतवणूक सल्ला, इन्शुरन्स, कस्टमर सपोर्ट, स्टॉक रिसर्च अशी अनेक कामे AI बॉट कडून करण्यात येतील. यामुळे कंपन्यांची आणि सर्वसामान्य गुंतवणुकदारांची कामे सोपे होतीलच. युरोप अमेरिकेतील बड्या कंपन्यांनी अशा AI कंपन्यांसोबत पार्टनरशिप करण्यास सुरुवात केली आहे. मॉर्गन स्टॅनली या गुंतवणूक क्षेत्रातील मोठ्या कंपनीने GhatGPT सोबत काम करण्यास सुरुवात केली आहे. GhatGPT-4 या अत्याधुनिक बॉटसोबत काम सुरू आहे. त्यासाठी रिसर्च लॅबही तयार करण्यात आली आहे.

गुंतवणूक करताना AI ची कशी मदत होते? 

गुंतवणूक, आर्थिक निर्णय हे जोखमीचे विषय असल्याने अद्याप AI द्वारे खूप प्राथमिक स्तरावरील कामे केली जातात. अनेक कंपन्यांकडून फायनान्ससंबंधित लेख जनरेटीव्ह AI मॉडेलमध्ये फीड केली जात आहेत. त्यानंतर गुतंवणुकीसंबंधित विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर बॉट कडून मिळत आहे. जसे की, पर्सनल फायनान्स टीप्स, एखाद्या शेअर्सच्या विश्लेषणामधील महत्त्वाच्या बाबी, डिटेल ग्राफ, कंपनीचा पूर्वेतिहास. अशा गोष्टीही फायद्याच्या ठरत आहेत. हे काम दिवसेंदिवस वाढत जाईल.

फायनान्शिअल क्षेत्रातील नोकऱ्या धोक्यात 

आर्थिक क्षेत्रातील फायनान्शिअल अॅनालिस्टच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात. एक्सल रिपोर्ट, ग्राफ, अहवाल, विश्लेषण, कंपन्यांच्या शेअर प्राइजचे टिकर तयार करणे अशी कामे AI टूल करू शकतील. त्यामुळे फायनान्शिअर अॅनलिस्टचे काम होऊ शकते. फक्त अॅनालिस्ट नाही तर इतरही कामे, जी दररोज त्याच पद्धतीने करावी लागतात ती कृत्रिम बुद्धिमत्तेवर सोपवता येतील त्यासाठीचे कामही वेगाने होत आहे.

गुंतवणूक, आर्थिक नियोजन, शेअर मार्केट यासंबंधी अफाट माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे. या माहितीचा वापर AI टूलकडून उत्पादने आणि सेवा चांगल्या करण्यासाठी वापरण्यात येऊ शकतो. AI टूलच्या वापराने गुंतणुकदार सल्ला घेऊ लागले तर आर्थिक सल्लागारांचे कामही कमी होईल. इनव्हेस्टर रिसर्च क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांना hila.ai या कंपनीने बनवलेले टूल मदत करत आहे. Sonic speed ही कंपनी बँकिंग क्षेत्रातील कंपन्यांना मदत करण्यासाठी AI टूल तयार करत आहे. याद्वारे गुंतणूकदारांना सल्ला दिला जाईल.