Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ahilyabai Holkar Free Pass Scheme: जाणून घ्या अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना

Ahilyabai Holkar Free Pass Scheme

Ahilyabai Holkar Free Pass Scheme:

अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना (Ahilyabai Holkar Free Pass Scheme) शैक्षणिक गरजवंतासाठी राज्य शासनातर्फे खास विद्यार्थीनींसाठी  अहिल्याबाई होळकर मोफत पास योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत सध्या ग्रामीण भागातील 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींना शाळेत जाण्यासाठी एसटीने मोफत प्रवास सवलत लागू आहे. यात खेड्यापाड्यावरील अथवा ग्रामीण भागातील माध्यमिक शिक्षणाची सोय नसलेल्या गरजू होतकरू विद्यार्थीनींना त्याच्या स्थानिक ठिकाणापासून सोईच्या ठिकाणापर्यंत मोफत प्रवास व्हावा आणि मुलीनां शिक्षण घेताना प्रवासामुळे देखील अळथडा निर्माण होऊ
नये म्हणून अहिल्यादेवी होळकर मोफत पास योजना राबवण्यात येते.

सवलतींचा तपशील (Details of Concessions)

  • अहिल्याबाई होळकर योजनेप्रमाणे इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थीनींसाठी सवलत साधी बससेवेनुसार देण्यात येईल.
  • प्रवासभाडयातील सवलत टक्केवारी 100% इतकी आहे. 
  • या योजनेअंतर्गत त्रैमासिक मोफत पास देण्यात येतो.

नोंदणी कशी करावी? (How to Register?)

  • सर्व प्रथम शाळेच्या मुख्याध्यापकांना मोफत पास योजनेसाठी अर्ज द्यावा लागेल.
  • मग पात्र मुख्याध्यापक विद्यार्थीनींची तपशिलवार यादी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना पाठवतील.
  • आगार प्रमुखांना मुलींची यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थीनीस तिमाही पास मोफत उपलब्ध करून देण्यात येतो.

पात्रता (Eligibility)

  1. दारिद्र रेषेखालील विद्यार्थीनींना प्राधान्य देण्यात येईल.
  2. फक्त ग्रामीण भागातील विद्यार्थीनीस परवानगी आहे
  3. जर स्थानिक ठिकाणीच शिक्षणाची सोय असेल तर ही योजना लागू होणार नाही किंवा मोफत पाससाठी ते अनुज्ञेय नाहीत
  4. तिमाहीचा पास महामंडळाकडून घेण्यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी दर महिन्यास विद्यार्थीनींची किमान उपस्थिती 75 टक्के असण्यासंबंधीचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास देणे आवश्यक.

आवश्यक कागदपत्रं (Necessary Document's)

  1. पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
  2. मोफत बस पाससाठी अर्ज भरा
  3. शाळेत शिकत असल्याचा दाखला
  4. शाळेचे ओळखपत्र
  5. आधारकार्ड

लाभ (benefits)

  • शाळेतील मुलीची गळती थांबेल
  • मुलींची शाळेतील उपस्थिती/ हजेरी वाढेल
  • आर्थिक गरज कमी होईल
  • भोगौलिक आंतर शिक्षणाच्या आळ येणार नाही सर्वसामान्य आर्थिक कमजोर घटकांना लाभ मिळेल

योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठे संपर्क करावा (Contact)

पालकवर्ग आपल्या पाल्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक किंवा महाविद्यालयाचे प्राचार्य याना संबंधित शाळा महाविद्यालयात संपर्क करू शकता किंवा जवळच्या बस डेपोशी संपर्क साधा.