Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Chandrayaan-3: चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर एरोस्पेस कंपन्यांचे शेअर्स तेजीत; बाजारभांडवल कोटींनी वाढले

Chandrayaan 3 mission

Image Source : www.indiatvnews.com

भारताच्या चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स तेजीत आहेत. मागील चार दिवसांत 13 कंपन्यांचे बाजारमूल्य 30 हजार कोटींनी वाढले. गुंतवणूकदारांनी एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स खरेदीला पसंती दिली.

Chandrayaan-3: सर्वात कमी बजेटमध्ये चांद्रयान मोहिम यशस्वी करून दाखवणारा भारत पहिला देश ठरला आहे. Chandrayaan-3 मोहिमेचे बजेट फक्त 615 कोटी रुपये होते. अमेरिका, चीन, रशियाच्या चांद्रयान मोहिमांपेक्षा हा खर्च खूप कमी आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रोव्हर यशस्वीरित्या उतरल्यानंतर एरोस्पेस कंपन्यांचे शेअर्स मात्र वर गेले. 

चालू आठवड्यातील पहिल्या चार दिवसांमध्ये 13 कंपन्यांचे मिळून बाजार भांडवल 30,700 कोटींनी वाढले. Centum Electronics या स्मॉल कॅप कंपनीने चांद्रयान -3 मोहिमेसाठी इस्रोला मशिनरीचा पुरवठा केला होता. या कंपनीचे शेअर्स चार दिवसांत 26% टक्क्यांनी वाढले.

अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांना डिमांड

भारतीयांवर मून फिवर चढला आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर फक्त याच विषयाची चर्चा सुरू आहे. (aerospace company share price) जगभरातूनही भारताच्या यशाचे कौतुक होत आहे. एरोस्पेस क्षेत्रातील कंपन्यांना दलाल स्ट्रिटवर चांगलाच फायदा झाला. 

गोदरेज इंडस्ट्रिजबाबत गुंतवणुकदारांची गफलत

दरम्यान, अवकाश तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्राशी काहीही संबंध नसलेल्या गोदरेज इंडस्ट्रीजचा शेअर्सही 8% टक्क्यांनी वाढला. इस्रोला मशिनरी पुरवठा करणारी गोदरेज एरोस्पेस ही कंपनी गोदरेज इंडस्ट्रिजची सहयोगी कंपनी असल्याचा अंदाज काही गुंतवणुकदारांनी बांधला. त्यामुळे गोदरेज इंडस्ट्रीचा शेअर्सही वाढला. 

चांद्रयान मिशनची ट्रॅकिंगची सिस्टिम बनवण्यामध्ये एल अँड टी कंपनी पहिल्यापासून सहभागी आहे. तर सार्वजनिक क्षेत्रातील मिश्र धातू निगम या कंपनीने तीन टप्प्यातील लिफ्ट लाँचसाठी LVM3 M4 अत्यंत महत्त्वाच्या सामग्रीचा पुरवठा केला. 

पीटीसी इंडस्ट्रीज या कंपनीने पंप संबंधित सामुग्री आणि MTAR या कंपनीने विकास इंजिन, क्रायोजेनिक इंजिन, टर्बो पंप, बुस्टर पंपचा पुरवठा केला. पारसने चांद्रायन-3 साठी नेव्हिगेशन सिस्टिमचा पुरवठा केला. भेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने टिटॅनियम धातूचा टँक आणि बॅटरीचा पुरवठा केला. चांद्रयान मिशनमध्ये सहभागी असलेल्या कंपन्यांचे भाव मिशन यशस्वी झाल्यानंतर वाढले. 

इस्रोचे भविष्यातील मिशन कोणते? 

गगनयान, आदित्य L1, XPoSat, NISAR आणि SPADEX अशी विविध मिशन इस्रो भविष्यात राबवणार आहे. या मिशनसाठीही एरोस्पेस कंपन्यांकडून यंत्रसामुग्रीचा पुरवठा केला जाईल. त्यामुळे येत्या काळात या कंपन्यांचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. चांद्रयान मोहिमेच्या यशानंतर ही झलक पाहायला मिळाली. त्यामुळे गुंतवणुकदार या कंपन्यांच्या शेअर्सकडे लक्ष ठेवून आहेत.