अॅपलनं (Apple) नुकतंच आपल्या स्मार्टफोन्सचं स्वत:चं स्टोअर भारतात सुरू केलं. मुंबई आणि दिल्लीत हे अद्ययावत स्टोअर सुरू झालं. आपल्या स्मार्टफोन्सचं (Smartphones) उत्पादन भारतात करण्याचा कंपनीनं निर्णय घेतला. त्याचा कंपनीला प्रचंड फायदा होतोय. कारण विक्रीचे समोर आलेले आकडे नवीन विक्रमच प्रस्थापित केल्याचं दाखवत आहेत. आता भारताची हीच फायद्याची बाजारपेठ ब्रिटनच्या मोबाइल कंपनीलाही भावलीय. इथली दिग्गज कंपनी नथिंगनं (Nothing) आता आपले स्मार्टफोन्स भारतात बनवण्याचा निर्णय घेतलाय.
Table of contents [Show]
फायदेच फायदे
परदेशातल्या कंपन्या भारतात आपलं उत्पादन करत असल्यानं दोन्ही बाजूंनी खरं तर फायदेच फायदे आहेत. संबंधित उत्पादन इथेच तयार होत असल्यानं त्याची सर्वसामान्यांना द्यायची किंमत कमी होते, कारण इतर खर्च वाचतो. रोजगाराच्या संधी निर्माण होतात. शिवाय संबंधित कंपनीला आपला व्यवसाय विस्तारदेखील करता येतो. अॅपलनं हीच बाब लक्षात घेत आता भारतीय बाजारपेठेवर अधिक लक्ष केंद्रीत केलं. अॅपलपाठोपाठ ब्रिटनच्या नथिंग कंपनीनंही भारतात आपलं उत्पादन करण्याचा निर्णय घेतलाय. मेक इन इंडियाच्या अंतर्गत यानिमित्तानं रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत.
To cater to the demands of the Indian market, smartphone company, #Nothing announced that their upcoming #smartphone, 'Phone (2)', will be manufactured in #India.
— IANS (@ians_india) June 5, 2023
"Nothing smartphones are known for their iconic transparent design". pic.twitter.com/7Ro4NsaVUC
ग्राहकांना आकर्षित करण्याचा उद्देश
नथिंगनं भारतात 4 टेक उत्पादनं लाँच केली आहेत. मात्र आता कंपनीला भारतात फोन बनवायचे आहेत. ग्राहकांना आपल्या उत्पादनांनी आकर्षित करणं हा कंपनीचा उद्देश आहे. भारत ही स्मार्टफोन्ससाठी एक मोठी बाजारपेठ आहे. भारतात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे. कस्टमर सपोर्ट वाढवण्यासाठी प्रॉडक्शनचं कामही सुरू केलं जाणार आहे. सध्या नथिंगचे भारतात 230पेक्षा जास्त अधिकृत सेवा केंद्रे (Authorised service centre) आहेत. नथिंग ही कंपनी 2020मध्ये लंडनमध्ये सुरू झाली. दरम्यान, कंपनीनं भारतात उत्पादन सुरू केल्यास रोजगाराच्या संधीही सर्वांसाठी खुल्या होणार आहेत.
प्लास्टिक फ्री अनबॉक्सिंग
पर्यावरणाची काळजी हे नथिंग ब्रँडच्या फोनचं सर्वात मोठे वैशिष्ट्य सांगितलं जातंय. इतर मोबाइल फोन्सच्या तुलनेत नथिंगचे स्मार्टफोन्स तिप्पट रिसायकल म्हणजेच इको फ्रेंडली भागांपासून बनवले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे, फोनचं अनबॉक्सिंग पूर्णपणे प्लास्टिक मुक्त आहे. फोनचे फायनल असेम्ब्ली पार्ट्स रिन्यूएबल एनर्जीवर काम करतील. 100 टक्के रिसायकल्ड अॅल्युमिनीअमपासून नथिंग स्मार्टफोनची फ्रेम बनवली जाईल.
अॅपल, नथिंग आणि भारतीय बाजारपेठ
एकीकडे अॅपलनं पुढच्या वर्षापासून दर महिन्याला 20 दशलक्ष फोन तयार करणार असल्याची घोषणा केली आहे. बेंगळुरूमध्ये कंपनीनं यासाठी जमीन घेण्यापासून ते उत्पादनापर्यंतचं संपूर्ण नियोजन केलंय. भारतातली वाढती बाजारपेठ पाहता अॅपल आपलं उत्पादन वाढवण्यावर भर देतंय. नथिंगही अॅपलच्या पावलावर पाऊल ठेवताना आता दिसून येत आहे.
नथिंगचं वैशिष्ट्य काय?
नथिंग स्मार्टफोन प्लास्टिक फ्री असणार आहेत. इंटर्नल फीचर्सचा विचार करता, नथिंगची स्वत:ची ऑपरेटिंग सिस्टम आहे. भारतात लॉन्झ झालेल्या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर वापरण्यात आलाय. 5G रेडी, OLED डिस्प्ले अशी काही फीचर्स या स्मार्टफोनमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे भारतातली नथिंगची योजना कशी यशस्वी होते, हे आगामी काळातच समजणार आहे.