Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aether EV Scooter: आता इलेक्ट्रिक स्कूटर घेताना पैशांची चिंताच मिटली, अ‍ॅथेर एनर्जीचा बजाज फायनान्ससोबत करार

Aether EV Scooter

Aether EV Scooter: सामान्य कुटुंबातील ग्राहकांना स्कूटर घेतांना सुध्दा फार विचार करावा लागतो, स्कूटर घेण्यास लोन कुठून मिळेल? डाऊन पेमेंट किती करावा लागेल? महिन्याला किती EMI भरावा लागेल? तसेच कुठल्या बँकेकडून किती टक्के व्याजाने लोन मिळेल? मात्र आता स्कूटर घेतांना पैशांची चिंता मिटली आहे. कारण अ‍ॅथेर एनर्जीने आता बजाज फायनान्ससोबत करार केलेला आहे.

Aether Energy Ties Up With Bajaj Finance: भारतातील आघाडीच्या इलेक्ट्रिक स्कूटर ब्रँड अ‍ॅथेर एनर्जीने बजाज फायनान्स लिमिटेड (BFL) सोबत भागीदारी केली आहे. यामुळे ईव्ही खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता गाडी घेणे सोपे झाले आहे. ईव्ही उद्योगाने गेल्या काही वर्षांत जोरदार वाढ केली आहे. अ‍ॅथेर एनर्जी ग्राहकांचा दुष्टीकोन लक्षात घेऊन, ग्राहकांना सेवा देत आहे.

चार्जिंगची सोय उपलब्ध होणार

अ‍ॅथर भारतातील ईव्ही दुचाकी उद्योगातील एक टॉपर कंपनी आहे, त्यामुळे सुविधा उपलब्ध करुन देण्यास तडजोड न करता, ईव्ही खरेदीची पध्दत सोपी करुन देणे ही कंपनीची जबाबदारी आहे. तसेच अ‍ॅथेरने आपल्या ग्राहकांना सर्वोत्तम चार्जिंगची सोय उपलब्ध करुन देण्यासाठी देखील काही गटांशी भागीदारी केली आहे.

100 टक्क्यांपर्यंत फायनान्स उपलब्ध

Ather Energy ची EV-टू-व्हीलर खरेदी करणार्‍या ग्राहकांना स्कूटरची जी ऑन रोड किंमत आहे, त्या किमतीच्या 100 टक्क्यांपर्यंत फायनान्स उपलब्ध होणार आहे. एवढेच नाही तर ग्राहकांना त्यासाठी पाच मिनिटांपेक्षा कमी वेळात लोन मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. अ‍ॅथेर एनर्जीसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या भागीदारीमुळे आम्हाला देशभरातील ग्राहकांना सेवा देण्याची संधी मिळाली आहे, असे मत बजाज फायनान्स लिमिटेडचे ​​अध्यक्ष अमित रघुवंशी यांनी व्यक्त केले.

Ather Energy च्या विक्रीत वाढ

Ather Energy ने मार्च महिन्यात एकूण 11,754 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली. तसेच, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीने एकूण 82,146 ईव्ही वाहनांची विक्री केली आहे.  Ather इलेक्ट्रिक स्कूटरने ग्राहकांची पसंती लक्षात घेता वर्षाच्या सुरुवातीला चार नवीन रंगाच्या स्कुटर्स मार्केटमध्ये आणल्या. यामध्ये आपण लोकेशन देखील चेक करु शकतो. तेव्हा अॅथेर इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये उपलब्ध असलेला गुगल मॅप आणखी अपडेट करण्यात आला आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर चालवताना ग्राहक आता थेट रहदारी नेव्हिगेशनचा देखील आनंद घेऊ शकतात. तसेच टच स्क्रिन देखील बदलण्यात आली आहे.

नव्या पिढीची Ather

नवीन पिढीकरिता  Ather 450 आता एकूण पाच राइडिंग मोड मध्ये उपलब्ध आहे. ज्यात वार्प, स्पोर्टराइड, इको आणि स्मार्ट इको राइडिंग मोड समाविष्ट आहेत. याचा टॉप स्पीड इको मोडवर 50-55 च्या दरम्यान येतो. त्याच वेळी, त्याच्या वार्प मोडमधील कमाल पॉवर आउटपुट सध्याच्या 6 kW (8.1 hp) वरून 6.4 kW (8.7 hp) पर्यंत वाढले आहे. यामुळे या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड जुन्या मॉडेलच्या तुलनेत थोडा जास्त झाला आहे. त्यामुळे साहजिकच ग्राहकांना आर्थिक नफा होतो.