ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) चित्रपट उद्या म्हणजेच शुक्रवारी देशातील संपूर्ण सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाची चर्चा ऐकायला मिळत आहे. भारतातील पौराणिक महाकाव्य रामायणावर आधारित या चित्रपटाचे कथानक रेखाटण्यात आले आहे. यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता प्रभास (Prabhas), बॉलीवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटाचे आगाऊ बुकिंग सुरू झाले असून सर्व सिनेमागृहांचे बुकिंग फुल करण्यात आले आहे. हा चित्रपट कधी आणि कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळेल, यासंदर्भातील चर्चेला उधाण आले आहे. चला तर याबाबतचे अपडेट जाणून घेऊयात.
'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर आदिपुरुष पाहता येणार!
आदिपुरुष चित्रपट शुक्रवारी 16 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 50 दिवसांनी तो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार आदिपुरुष चित्रपटाने आपला ओटीटी पार्टनर निश्चित केला आहे. प्रेक्षकांना अमेझॉन प्राईमवर (Amazon Prime) हा चित्रपट पाहता येणार आहे. चित्रपटाच्या मेकर्स आणि ओटीटी प्लॅटफॉर्ममध्ये 250 कोटी रुपयांची डील झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासोबतच चित्रपटाने म्युझिक, सॅटेलाईट आणि डिजिटल राईट्स विकून 432 कोटींहून अधिकची कमाई केली आहे.
चित्रपटाचे बजेट जाणून घ्या
2023 मधील सर्वात मोठा बजेट असणारा चित्रपट म्हणजे 'आदिपुरूष'. 500 कोटींचे बजेट असणारा हा चित्रपट शुक्रवारी देशभरात प्रदर्शित होत आहे. ओम राऊत यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून यासाठी अजय अतुल (Ajay-Atul) यांनी संगीत दिले आहे. विशेष म्हणजे हिंदी आणि तेलगू भाषेत हा चित्रपट एकाच वेळी शूट करण्यात आला आहे.
ॲडव्हान्स बुकिंगमधून केली 'इतकी' कमाई
Koimoi च्या माहितीनुसार, चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीने 11 जूनच्या रात्री ब्लॉक केलेल्या सीट्स वगळता एकूण 1.40 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 3D आवृत्तीने 1.35 कोटी रुपये कमावले आहेत. तसेच हिंदी व तेलगू चित्रपटातील गाण्यांचे राईट्स विकून आतापर्यंत 430 कोटीहून अधिकची कमाई चित्रपटाने केली आहे.
Source: english.jagran.com