Adani Group: अदानी समूहाला मिळालं धारावी पुनर्विकासाचे कंत्राट, तब्बल 5000 कोटींचे टेंडर जिंकले आहे. आज धारावी पुनर्विकासाच्या निविदा खुल्या करण्यात आल्या. यात अदानी समूहाची (Adani Group) 5069 कोटींचे टेंडरला मंजूर करण्यात आल्याचे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे प्रमुख एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले.धारावीच्या पुनर्विकासासाठी अदानी आणि DLF कंपनीने दाखल केलेले टेंडर उघडले. नमन ग्रुपचे टेंडरबाद झाले. अदानी समुहाने निविदेत 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती. तर, DLF कंपनीने 2,025 कोटी रुपयांची बोली लावली होती.
अदानी समूहाला धारावी पुनर्विकासाचे टेंडर मिळाल्याने अदानी रियल्टी या कंपनीला मुंबईतील स्थावर मालमत्ता क्षेत्रात मोठं व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. अदानी रियल्टीसाठी रियल्टी क्षेत्रात आघाडी मिळवण्याची मोठी संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. तब्बल 600 एकरात धारावी वसलेली आहे. यात 58 हजार कुटंबे राहत असून 12 हजारांहून अधिक छोटे मोठे उद्योग आहेत.
गेल्या 15 वर्षात महाराष्ट्र सरकारने पुनर्विकासासाठी किमान चार प्रयत्न केले आहेत.धारावी पुनर्विकास प्रकल्प हा सुमारे 20 हजार कोटींचा असून मोठी गुंतवणूक या प्रकल्पात होणार आहे.येत्या 17वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सरकारचे आहे.आगामी सात वर्षात संपूर्ण पुनर्वसन करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
धारावीत मोठ्या संख्येने छोटे-मोठे व्यवसाय असून राज्याच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत आलेल्या व्यक्ती धारावीत स्थिरावल्या आहेत. साधारणपणे 10 लाख नागरीक धारावीत वास्तव्य करत आहे. धारावी हे अतिशय मोक्याच्या ठिकाणी एका बाजूला वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स असून या ठिकाणाहून शहरातील कोणत्याही भागात जाणे शक्य आहे.त्यामुळे धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर या परिसराचा आणि मुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे.