अदानी ग्रुपच्या NDTV मधील हिस्सा खरेदीसाठी जारी केलेल्या ओपन ऑफरला शुक्रवारी चौथ्या दिवशीही शेअर मार्केटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. अदानीची ऑफर किंमत 294 रुपये प्रति शेअर आहे, तर NDTV चा हा शेअर शुक्रवारअखेर 386.80 रुपयांवर बंद झाला. मात्र तरिही या आतापर्यंत 39 लाख 35 हजार शेअरचे ओपन ऑफरमध्ये ट्रेडिंग झाले.
Adani Open offer ला मंगळवारी सुरुवात झाली. याची ऑफर प्राईज 294 रुपये इतकी होती. मात्र तिसऱ्या दिवशीपर्यंत याला उत्तम प्रतिसाद मिळतं गेला. तिसऱ्या दिवशी गुरुवार अखेर शेअर्स 368.40 वर स्थिरावले होते. ही किमत ऑफर केलेल्या किंमतीच्या 25.3 टक्के जास्त होती. शुक्रवारी एनडीटिव्हीचे शेअर्स आणखी 5 टक्के म्हणजे 18. 40 रुपयांनी वाढून 386.80 रुपयांवर बंद झाले. यातून चौथ्या दिवसानंतरही ऑफर केलेल्या किमतीपेक्षा मोठी वाढ़ दिसून येतेय.
5 डिसेंबरला होणार ऑफर बंद
अदानी समुहाच्या वतीने या ओपन ऑफरचे व्यवस्थापन जे.एम फायनान्शियल करत आहे. 5 डिसेंबर 2022 ला ही ऑफर बंद होईल. सेबीकडे 5 नोव्हेंबरला याविषयीचा प्रस्ताव देण्यात आला होता. ज्याला सेबीने 492.81 कोटीच्या ओपन ऑफरला मंजुरी दिली होती.
काय आहे मूळ विषय
अदानी समूहाने ऑगस्टमध्ये Vishvapradhan Commercial Pvt Ltd (वीसीपीएल) अधिग्रहण करण्याचे जाहीर केले होते. वीसीपीएलने एनडीटिव्हीच्या संस्थापकांना 10 वर्षांपूर्वी 400 कोटी रुपयापेक्षा अधिक रक्कम कर्ज स्वरूपात दिली होती. या बदल्यात कर्जदात्याला कोणत्याही वेळी एनडीटिव्हीमध्ये (NDTV) 29.18 टक्के हिस्सेदारी घेण्याची तरतूद यामध्ये करण्यात आली होती. यानंतर अदानी समूहाने जाहीर केल्याप्रमाणे विपीसीएलचे अधिग्रहण केले. यानंतर विपीसीएलने 17 ऑक्टोबरला जाहीर केले होते की, अतिरिक्त 26 टक्के खरेदी करण्यासाठी त्यांच्याकडून ओपन ऑफर जारी करण्यात आली. विसीपीएल बरोबरचं एएमजी मीडिया नेटवर्क्स आणि अदानी एंटरप्रायझेस लिमिटेड या 26 टक्के हिस्सेदारीची खरेदीदार असेल.
Adani Open Offer नुसार, 294 रुपये प्रति शेअर अशा किमतीवर 1.67 कोटी शेअर्सची ऑफर केली जातं आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अदानी समूहाची एकूण गुंतवणूक 492.91 कोटी इतकी वाढणार आहे.