Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Adani Group Stocks: अदानी ग्रुपच्या शेअर्सनी गुंतवणूकदार हवालदिल; 16 टक्क्यांनी शेअर्स घसरले!

Adani Group Stocks Fall

Image Source : www.dawn.com

Adani Group Stocks: अदानी ग्रुपमधील अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन, अदानी पोर्ट्स आणि अदानी ग्रीन या कंपन्यांचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले आहेत. फक्त अदानी इंटरप्रायसेसचा शेअर थोड्याफार किमतीने फायद्यात दिसत आहे.

Adani Group Stocks Fall: गेल्या 1 महिन्यापासून अदानी समुहातील बऱ्याचशा कंपन्यांचे शेअर्स तोट्यात असल्याचे दिसून येत आहे. सध्या तर सेन्सेक्स आणि निफ्टी हे दोन्ही निर्देशांक जोरदार मुसंडी मारत आहेत. तरीही अदानी ग्रुपमधील एकदोन कंपन्या वगळता इतर कंपन्याचे शेअर्स जवळजवळ 16 टक्क्यांनी घसरले आहेत. या सर्वांमध्ये अदानी इंटरप्रायसेस कंपनीचा शेअर्स तुलनेने थोड्याफार किमतीने नफ्यात दिसत आहे.

अदानी विल्मर आणि अदानी पॉवर महिन्याभरात घसरला!

Adani Wilmar Share Price

2022 च्या वर्षभरात 143 टक्क्याहून अधिक नफा देणारा अदानी विल्मर (Adani Wilmar Limited) कंपनीचा शेअर्स सध्या खूपच घसरला आहे. अदानी विल्मरचा शेअर मागील महिन्याभरात 5.26 टक्क्यांनी खाली आला आहे. बुधवारी (दि. 7 डिसेंबर) तो 652.50 रुपयांवर बंद झाला होता. तर गुरूवारी (दि. 8 डिसेंबर) सकाळी 656 रुपयांवर ओपन झाला होता. दुपारी 2.30 वाजेपर्यंत तो 654 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. 

Adani Power Share Price

अदानी पॉवरनेही (Adani Power) वर्षभरात अशाच पद्धतीने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. पण गेल्या महिन्याभरापासून हा शेअर 11 टक्क्यांनी खाली आला आहे. गेल्या वर्षभरात अदानी पॉवरने 220 टक्के रिटर्न दिले आहेत. बुधवारी (दि.7 डिसेंबर) तो 324.50 रुपयांवर बंद झाला होता. तर गुरूवारी (दि.8 डिसेंबर) सकाळी 326 रुपयांवर ओपन होऊन सध्या 324.40 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे.

अदानी ट्रान्समिशनच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण!

अदानी टोटल गॅस (Adani Total Gas Company) कंपनीचा शेअर देखील गेल्या महिन्याभरात 2.11 टक्क्यांनी घसरून सध्या 3702 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. या शेअर्सने वर्षभरात आतापर्यंत 113 टक्क्यांपर्यंत रिटर्न्स दिले आहेत. तर अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण झाली आहे. गेल्या महिन्याभरात अदानी ट्रान्समिशनचा (Adani Transmission) शेअर 17 टक्क्यांनी घसरला असून तो 2707 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. वर्षभरात या शेअर्सने 58 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत.

अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअरमध्ये 8 टक्क्यांची घसरण!

Adani Green Energy share price

अदानी पोर्टचा (Adani Port) शेअर गेल्या महिन्याभरात फक्त 0.29 टक्क्यांनी घसरून 893 रुपयांवर ट्रेडिंग करत आहे. गेल्या वर्षभरात या कंपनीने गुंतवणूकदारांना 21 टक्के रिटर्न दिला आहे. तर अदानी ग्रीन एनर्जीचा (Adani Green Energy) शेअर सध्या काळात 8 टक्क्यांनी घसरला आहे. बुधवारी अदानी ग्रीनचा शेअर 2034.95 रुपयांवर बंद झाला होता. तर गुरूवारी सकाळी तो 2042.90 रुपयांवर ट्रेडिंग करत होता. वर्षभरात ये कंपनीने 51 रिटर्न दिले आहेत.

Chart Source: https://money.rediff.com