इलेक्ट्रिक टू-व्हीलर (Electric two wheeler) बनवणाऱ्या गुजरातमधल्या आर्या या कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, कमांडर ई-बाइक जुलै-ऑगस्टमध्ये देशात लाँच केली जाणार आहे. आर्या ऑटोमोबाइल्सचे संचालक तुषार चभाया यांच्या म्हणाले, की आगामी इलेक्ट्रिक बाइक क्लासिक सेगमेंटमधलं पहिलं उत्पादन असणार आहे. नवीन कमांडर ई-बाइक पूर्ण चार्ज केल्यावर 125 किलोमीटरची रेंज देईल, असा दावा कंपनीनं केला आहे. या बाइकची किंमत एक्स शो-रूम 1.9 लाख रुपये आहे.
Table of contents [Show]
बॅटरीविषयी...
आर्या कमांडर इलेक्ट्रिक बाइक 4.3 kWh क्षमतेच्या लिथियम-आयन बॅटरीद्वारे चालविली जाईल. ही बॅटरी 3 तासात फुल चार्ज होऊ शकते. त्यात डीसी हब प्रकारची मोटर उपलब्ध असणार आहे. कमांडर इव्हीची इलेक्ट्रिक मोटर 3000 वॅट्स म्हणजेच 4.02 bhp पॉवर आणि 170 Nm टॉर्क जनरेट करणारी असेल. आर्या ऑटोमोबाइल्सच्या म्हणण्यानुसार, कमांडर ई-बाइक एका चार्जवर म्हणजेच फुल चार्जवर 125 किलोमीटर अंतर कापू शकते. ही बाइक ताशी 85 किलोमीटर वेगानं धावू शकते. कमांडर क्लासिक बॉडी टाइप बाइकमध्ये स्वॅप करण्यायोग्य बॅटरीला परवानगी दिली जाणार नाही.
हार्डवेअर आणि फीचर्स
आर्या कमांडर ही क्लासिक बॉडी टाइप इलेक्ट्रिक बाइक आहे. यामध्ये 7 इंचाचा टच स्क्रीन डिस्प्ले असेल. ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर बाइकच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस डिस्क ब्रेक्स असणार आहेत. प्रवासादरम्यान धक्क्यांचा त्रास कमी करण्यासाठी बाइकच्या मागच्या बाजूस ड्युअल सस्पेन्शन शॉक अॅब्सॉर्बर असतील. बॅटरी चार्ज करण्यासाठी यूएसबी चार्जिंग पोर्ट असणार आहे. अलर्टसाठी लो बॅटरी इंडिकेटर असणार आहे. स्टार्टिंगसाठी इग्निशन लॉक की टाइप एअर-कूल्ड टेक्नॉलॉजीनं युक्त असेल. कनेक्टिव्हिटीसाठी ब्लू-टूथ आणि वाय-फायची सुविधा असणार आहे. या बाईकचं वजन 135 किलो इतकं असेल.
रिव्हर्स असिस्ट फीचर
हेडलाइट्स, टेललाइट्स आणि टर्न सिग्नल लँप एलईडीचे असतील. बाइकला ट्यूबलेस टायर्ससह 17-इंच अॅलॉय व्हील मिळणार आहेत. या बाइकला 67 वॉटर प्रूफ रेटिंग देण्यात आली आहे. कमांडर ईव्हीमध्ये रिव्हर्स असिस्ट फीचरदेखील दिसणार आहे. यामध्ये जीपीएस नेव्हिगेशन, डिजिटल स्पीडोमीटर, ओडोमीटर, ट्रिपमीटर, जिओ फेन्सिंग, थ्रॉटल कंट्रोल, एनएफसी, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट अलर्ट आणि फॉल अँड क्रॅश सेन्सर यांसारखी फीचर्स असतील. ड्रायव्हरला त्वरित अलर्टदेखील ती करतील. आणीबाणी सिंगल व्हेरियंट क्लासिक सेगमेंट बाइकमध्ये बाइक रायडरच्या पायांच्या आरामासाठी स्प्लिट टाइप सीट आणि पॅसेंजर फूटरेस्ट मिळणार आहे.
किंमत काय?
आर्या ऑटोमोबाइल्सचे संचालक तुषार चभाया यांनी सांगितलं, की अलीकडेच ईव्हीवर देण्यात येणाऱ्या फेम 2 (FAME II) अनुदानामध्ये (Subsidy) बदल करण्यात आला आहे. कमांडर इलेक्ट्रिक बाइकची किंमत सुमारे 1.9 लाख रुपये असणार आहे. तुषार चभाया यांनी सांगितलं, की कंपनीची आगामी ईव्ही जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च केली जाणार आहे. बाजारात नवीन बाइक 6 कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. यात व्हाइट, ब्लॅक ग्लॉसी, ब्लॅक मॅट, मिलिटरी ग्रीन, चेरी रेड, रॉयल ब्लू, ग्रे असे रंग असणार आहेत. तर इकॉनॉमी, राइड, स्पोर्ट, रिव्हर्स आणि पार्किंग असं पाच राइडिंग मोड्स यात मिळतील.