Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Aadhar Card : आधारकार्ड बनवण्यासाठी पैसे मागितले जात आहेत! तर अशी करा ऑनलाइन तक्रार

Aadhar Card

Image Source : www.livemint.com

आधार कार्ड (Aadhar Card) बनवण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी कोणी तुमच्याकडे खूप जास्त पैसे मागत असेल तर सावध व्हा. तसेच असे आढळून आल्यास त्याबद्दल ऑनलाईन तक्रार करा. ऑनलाईन तक्रार कशी करायची? ते पाहूया.

आधार कार्ड (Aadhar Card) प्रत्येक भारतीयासाठी अनिवार्य कागदपत्र बनले आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून आधार कार्ड मोफत काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. यासाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही. मात्र, असे असतानाही अनेक आधार केंद्रे (Aadhar Centers) आधार बनवण्यासाठी पैसे घेतात का? तसेच काही आधारमध्ये अपडेटच्या नावाखाली 500 ते 1000 रुपये आकारले जातात. आधारमध्ये पत्ता आणि मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी जास्तीत जास्त 50 रुपये शुल्क आकारले जाते. याशिवाय तुम्ही कोणतेही शुल्क भरू नये.

तक्रार कशी करावी?

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी किंवा ते बनवण्यासाठी कोणी तुमच्याकडे जास्त पैसे मागत असेल तर ऑनलाइन तक्रार करता येईल. यासाठी तुम्ही 1947 वर तक्रार करू शकता आणि त्यानंतर तुम्ही पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्याची किंवा आधार केंद्राची तक्रार करू शकता. हे देशातील निवडक 12 भाषांना सपोर्ट करते.

चॅटबॉटकडे तक्रार करा

याशिवाय आधार मित्राचा चॅटबॉट https://uidai.gov.in वरून करता येईल. याशिवाय help@uidai.gov.in या ईमेलद्वारे मेसेज करूनही तक्रार करता येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालयात जाऊन तक्रार करू शकता.

ऑनलाइन तक्रार कशी करावी

  • सर्वप्रथम https://myaadhaar.uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
  • त्याच्या कम्प्लेंट सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नाव, संपर्क क्रमांक आणि राज्य माहिती विचारली जाईल.
  • यानंतर, ड्रॉप डाउन मेनूमधून तक्रारीचा प्रकार निवडावा लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नावनोंदणी, ऑपरेटर आणि एजन्सीचे तपशील विचारले जातील.
  • यानंतर कॅप्चा कोड टाकावा लागेल.
  • त्यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाईल.

टीप - तक्रार योग्य आढळल्यास, त्या आधार केंद्राची नोंदणी UIDAI द्वारे रद्द केली जाईल, ज्यांची तुमच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे.