Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?

ITR Filing: मृत व्यक्तीचाही असतो इन्कम टॅक्स रिटर्न! कोणी भरावा? नियम काय?

ITR Filing: मृत व्यक्तीलाही इन्कम टॅक्स रिटर्न भरणं गरजेचं आहे. होय... हे थोडं विचित्र वाटेल, मात्र अशा व्यक्तींचाही आयकर भरणं आवश्यक आहे. मृत व्यक्तीकडेही आयकर रिटर्न फाइल असते. आयकर नियमांनुसार, जर मृत व्यक्तीचं कोणतंही उत्पन्न असेल तर त्यासंदर्भातले रिटर्न (ITR) भरावे लागतात.

मृत व्यक्तींच्या आयकराबाबतच्या अशा प्रकरणांमध्ये कायदेशीर वारस इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Filing) भरू शकतो. नियमासोबतच, मृत व्यक्तीचं आयकर विवरणपत्र भरणं कायदेशीर वारसाचं कर्तव्य आहे. कर तज्ज्ञांच्या मते, मृत व्यक्तीचा आयकर रिटर्न भरण्यापूर्वी कायदेशीर वारसाला वारस म्हणून स्वतःची नोंदणी करणं गरजेचं आहे. ही प्रक्रिया घरी बसून सहज करता येते.

प्राप्तिकर विभाग करू शकतं कारवाई

कायदेशीर वारसाला मृत व्यक्ती जिवंत असेपर्यंत त्याचा आयटीआर भरणं नियमानुसार बंधनकारक आहे. त्याला कर भरावा लागणार आहे. तसंच तो रिफंडदेखील (ITR परतावा) क्लेम करू शकतो. कायदेशीर वारस हा डीम्ड अॅसेसी असतो. त्यामुळे जर त्यानं रिटर्न भरण्यास टाळाटाळ केली किंवा न भरण्याचा निर्णय घेतला, तर प्राप्तिकर विभाग तशाच प्रकारची कारवाई करेल, जसं मृत व्यक्ती जिवंत असताना केली जाते.

आयटीआर भरण्यासाठी कशी करायची ऑनलाइन नोंदणी?

  • https://www.incometaxindiaefiling.gov.in/home याठिकाणी आयकर ई-फायलिंग वेबसाइटवर जावं.
  • तुमचे क्रेडेन्शियल्स वापरून लॉग इन करा आणि My accountवर क्लिक करावं.
  • प्रतिनिधी म्हणून स्वतःची नोंदणी करावी.
  • मृत व्यक्तीच्या वतीनं New requestवर क्लिक करा आणि पुढे जावं.
  • मृत व्यक्तीचं पॅन कार्ड, मृत व्यक्तीचं पूर्ण नाव आणि मृत व्यक्तीचं बँक खातं असा सर्व तपशील भरावा.
  • तुमची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यानंतर, तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक एसएमएस मिळेल.

कसा भरावा मृत व्यक्तीचा आयटीआर?

  • कायदेशीर वारस म्हणून स्वतःची नोंदणी केल्यानंतर, वेबसाइटवरून आयटीआर फॉर्म डाउनलोड करावा.
  • सर्व तपशील भरल्यानंतर, फॉर्मची XML फाइल तयार करावी, कारण ती फक्त XML स्वरूपातच अपलोड केली जाऊ शकते.
  • पॅन कार्डच्या डिटेल ऑप्शनमध्ये कायदेशीर वारसाला त्याचे डिटेल्स द्यावे लागतील. आयटीआर फॉर्मचं नाव आणि मूल्यांकन वर्षाचा पर्याय निवडावा.
  • XML ​​फाइल अपलोड केल्यानंतर आणि त्यावर डिजिटल स्वाक्षरी केल्यानंतर, फॉर्म सबमिट केला होईल.

कसं मोजलं जाणार मृत व्यक्तीचं उत्पन्न?

तज्ज्ञांच्या मते, मृत व्यक्तीच्या उत्पन्नाची गणना करण्याची प्रक्रिया तशीच असते, जशी सर्व वजावट आणि सवलतींनंतर सामान्यपणे इन्कम कॅलक्युलेट केलं जातं. याठिकाणी फरक केवळ एवढाच आहे, की संपूर्ण वर्षाच्या ऐवजी, व्यक्ती जिवंत होती त्या तारखेपर्यंतच उत्पन्न मोजलं जातं. त्यानंतरच त्याचं आयटीआर फाइलिंग करता येवू शकतं.