Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Skilled Workers Shortage: 81% उद्योगांना कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा; तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे जॉब मार्केटमध्ये उलथापालथ

skill development

Image Source : www.fortune.com

जगभरात कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा निर्माण झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. तंत्रज्ञानात वेगाने बदल होत असल्याने कर्मचाऱ्यांनाही नवे कौशल्य शिकणे गरजेचे आहे. मात्र, विविध क्षेत्रातील कंपन्यांना कुशल कर्मचारी मिळत नाहीत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त इतरही क्षेत्रात टेक्निकल स्किल्स असणे गरजेचे झाले आहे.

Skilled Workers Shortage: माहिती तंत्रज्ञानासोबतच अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रांमध्ये वेगाने बदल होत आहेत. सहा महिने ते एक वर्षाच्या आत नवी टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये येऊन धडकत आहे. मोबाइल फोन, लॅपटॉप, किंवा तुमच्या आवडत्या कारचे अपडेटेड मॉडेल ग्राहकासांठी काही अवधीतच उपलब्ध होत आहे. माहिती तंत्रज्ञानासोबत इतरही क्षेत्रांत कुशल कर्मचाऱ्यांची गरज भासत आहे. अनेक कंपन्यांना टेक्निकल कौशल्ये असलेल्या कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासू लागला आहे.

कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा

EY and iMocha या व्यावसायिक सेवा पुरवणाऱ्या आणि कौशल्य मूल्यमापन करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांनी एक सर्व्हेक्षण केले आहे. तसेच Tech skills transformation  नावाचा अहवाल सादर केला आहे. (Skilled worker shortage in India) सर्व्हेक्षणादरम्यान, विविध कंपन्यांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, उद्योजकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. फक्त भारतातच नाही तर अमेरिका, युरोपातील परिस्थितीचाही आढावा घेतला. माहिती तंत्रज्ञान, ऑटो, निर्मिती, बँकिंग, टेलिकॉम यासारख्या विविध इंडस्ट्रीमधील कंपन्यांशी चर्चा केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली.

एखाद्या क्षेत्रात काम करत असताना सर्वाधिक मागणी असणारे कौशल्ये कोणती, कर्मचारी ते कसे आत्मसात करतात आणि एकूण कामकाजावर या नव्या कौशल्याचा कसा परिणाम होता, असे प्रश्न सर्व्हेदरम्यान विचारण्यात आले. सर्व्हेक्षण करण्यात आलेल्या कंपन्यांपैकी 81% कंपन्यांनी कुशल कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासत असल्याचे म्हटले.

भारताचा जागतिक स्किल्ड वर्कर फोर्समध्ये वाटा किती?

कंपन्यांमधील नोकरीच्या संधी आणि त्यासाठी आवश्यक कौशल्ये यातील दरी वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या नोकरभरतीच्या धोरणात बदल करत आहेत. कुशल कर्मचारी पुरवठा करणारा भारत हा जगातील प्रमुख देशांपैकी एक आहे. जागतिक स्किल्ड वर्करमध्ये भारताचा वाटा 16% आहे. संपूर्ण युरोपचा वाटा 16% असून अमेरिकेचा वाटा 20% आहे.

तरुणांनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी काय करावे?

टेक्निकल कौशल्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना जागतिक स्तरावर मोठी मागणी आहे. फक्त कॉलेज महाविद्यालयीन पदवी घेऊन भागणार नाही. त्यासाठी तरुणांनी प्रत्यक्ष काम करत असताना कौशल्य शिकण्यावर भर द्यायला हवा. तसेच काही स्किल्स शिकण्यासाठी कोर्सेसही करू शकता. मात्र, त्यासाठी त्या विशिष्ट कौशल्याला बाजारात किती मागणी आहे याचा आधी अंदाज घ्या. कोर्सस केल्यानंतर त्या संबंधित काम करण्यासाठी इंटर्नशिप मिळवण्याचा प्रयत्न करा. त्याद्वारे नवे स्किल शिकण्याची प्रकिया जलद होते. 

टेक स्किल्स आणि पगारवाढ

जर तुमच्याकडे नव्याने बाजारात आलेले कौशल्य असतील तर तुम्हाला चांगला पगार मिळण्याचीही शक्यता असते. तसेच नोकरी सर्च करताना जास्त पगारवाढ मिळू शकते. फ्रेशर्ससाठी नवे स्किल्स शिकणे जसे अत्यंत आवश्यक आहे तसे आधीपासून काम करणारे कर्मचारी नव्या क्षेत्रात प्रवेश करू शकतात. मात्र, त्यासाठी नवे कौशल्य शिकण्यासाठी वेळ खर्च करावा लागेल.