Jyotirlinga Yatra : चातुर्मासामध्ये भारतात धार्मिक स्थळांचे दर्शन घेण्यास अधिक महत्व दिले जाते. विशेषत: महादेव मंदिरांच्या दर्शनाला अधिक प्राधान्य दिले जाते. या पार्श्वभूमीवर भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी ज्योतिर्लिंग यात्रेसाठी विशेष पॅकेजची सुरुवात केली आहे. या पॅकेजअंतर्गत भारतीय रेल्वेने प्रवासी भाविकांसाठी 7 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. ही ज्योतिर्लिंग यात्रा कोणकोणत्या ठिकाणांवर जाणार आहे. किती दिवसाची आहे? यासाठी किती खर्च येणार याबाबतची माहिती जाणून घेऊयात.
27 जुलैला ऋषिकेशमधून सुटेल विशेष रेल्वे-
भारतीय रेल्वेने (IRCTC) खास चातुर्मासानिमित्त विशेष टूर पॅकेजची घोषणा केली आहे. यासाठी रेल्वेच्या भारत गौरव पर्यटक ट्रेनच्या माध्यमातून भाविकांना 7 ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेता येणार आहे. ही यात्रा 27 जुलै रोजी योग नगरी ऋषिकेश येथून सुरु होणार आहे. या दरम्यान भाविकांना पुढील ज्योतिर्लिंगाचे दर्शन करवून आणण्यात येणार आहे.
- ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग
- महाकालेश्वर ज्योतिर्लिंग
- सोमनाथ ज्योतिर्लिंग
- द्वारकाधीश मंदिर
- नागेश्वर ज्योतिर्लिंग
- द्वारका शहर
- त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग
- घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग
- भीमाशंकर ज्योतिर्लिंग
9 दिवस आणि 10 रात्री -
IRCTC चे हे टूर पॅकेज 9 दिवस आणि 10 रात्रीचे आहे. जर एखाद्या भक्ताने स्लीपर क्लासने प्रवास केला तर त्यासाठी प्रति व्यक्ती फक्त 18,925/- रुपये खर्च येईल. तर 3AC मध्ये प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती 31,769/- रुपये मोजावे लागतील. जर तुम्हाला 2-AC मध्ये प्रवास करायचा असेल तर तुम्हाला 42,163/- रुपये द्यावे लागतील. दरम्यान रेल्वेने या ज्योतिर्लिंग दर्शन यात्रेसाठी तिकीट खर्चाचे हप्ते म्हणजे EMI भरण्याचीही सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी तुम्हाला किमान 917 रुपयांचा मासिक हप्ता द्यावा लागेल. या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून ( inyurl.com/NZBG239D ) तुमची टूर बुक करावी लागेल.