Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Road Projects: देशभरातील 674 रस्ते प्रकल्पांची कामे रखडली; सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रातील

highway construction project dealy

Image Source : www.sbcivils.co.uk

देशातील महत्त्वाचे 674 महामार्ग बांधकाम प्रकल्प रखडल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिली. सर्वाधिक रेंगाळलेले प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहेत. त्याखालोखाल आंध्रप्रदेशचा नंबर लागतो.

Delayed Road Construction Projects: देशातील रस्ते बांधकामाचे काम वेगाने सुरू असल्याचा दावा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी कायम करतात. मात्र, आकडेवारी काहीतरी वेगळेच चित्र दाखवत आहे. देशातील 674 महत्त्वाचे रस्ते बांधकाम प्रकल्प रखडल्याची माहिती समोर आली आहे. या रेंगाळलेल्या प्रकल्पांची एकूण किंमत 2 लाख 81 हजार कोटींपेक्षा जास्त आहे. 

नितीन गडकरी यांची संसदेत माहिती

जून 2023 पर्यंतची ही आकडेवारी आहे. सर्वाधिक रखडलेले प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहेत. (Highway construction project delayed) त्यानंतर आंध्रप्रदेश, उत्तराखंड राज्यातील प्रकल्प संथगतीने सुरू आहेत. 674 रस्ते बांधकाम प्रकल्पांची कामे नियोजित वेळेच्या मागे पडले आहेत, असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे. 

महाराष्ट्रातील प्रकल्पांची संख्या किती?

राज्यातील 99 रस्ते प्रकल्पांची 9 हजार कोटींपेक्षा जास्त किंमतीची कामे मागे पडली आहेत. रखडलेल्या प्रकल्पांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. त्याखालोखाल आंध्रप्रदेशातील 34, उत्तराखंडमधील 31, तामिळनाडूतील 30 प्रकल्प टाइम टेबलच्या मागे पडले आहेत.

मागील तीन वर्षात महाराष्ट्राच्या वाट्याला सर्वाधिक रस्ते बांधकाम प्रकल्प आले आहेत. एकूण प्रकल्पांची संख्या 159 आहे. त्यानंतर तामिळनाडू, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटकाला जास्त प्रकल्प मिळाले.

नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) आणि इतर यंत्रणांद्वारे या प्रकल्पांचे काम हाती घेण्यात येते. NHIDCL, राज्य बांधकाम विभाग, सीमा रस्ते विभाग (BRO) द्वारे मोठे प्रकल्प राबवण्यात येतात. मात्र, यातील अनेक प्रकल्प संथ गतीने सुरू आहेत.

मागे पडलेल्या प्रकल्पांचा खर्च

दरम्यान, प्रत्येक रखडलेल्या प्रकल्पाची किंमत वाढत नाही. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कंत्राटाचा अंतिम हिशोब केला जातो. मात्र, जर कंत्राटदाराकडून प्रकल्पाचे काम रखडल्यास अतिरिक्त खर्चाची रक्कम दिली जात नाही. तसेच नुकसानभरपाई कंत्राटदाराकडून वसूल केली जाते, असे नितीन गडकरी यांनी म्हटले.

2014 साली देशातील राष्ट्रीय महामार्गाचे जाळे 91 हजार किलोमीटरचे होते. त्यात वाढ होऊन आता 1 लाख 46 हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग तयार झाले आहेत.