Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

James Cameron: अबब! 5000 कोटी संपत्तीचे मालक आहेत, 'अवतार 2' व 'टायटॅनिक'चे दिग्दर्शक, त्यांची लग्झरी लाइफ जाणून घेवुयात

James Cameron Net Worth

Image Source : http://www.nrc.nl/

James Cameron Net Worth:अवतार 2 व टायटॅनिक हे चित्रपट संपूर्ण जगात ब्लाॅकबस्टर ठरले आहे. अजून ही टायटॅनिक चित्रपटाची चर्चा होते, तर अवतार 2 चित्रपटानेदेखील छप्पर फाडके कमाई केली होती. चला, तर मग या चित्रपटाचे दिग्दर्शक 'जेम्स कॅमरून' यांच्या लक्झरी लाइफविषयी जाणून घेवुयात.

James Cameron News: जेम्स कॅमेरून (James Cameron) हे 5000 कोटी संपत्तीचे मालक आहेत. त्यांनी ‘अवतार 2’ (Avatar 2) व टायटॅनिक (Titanic) या जबरदस्त चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहेत. त्यांचे हे दोन्ही चित्रपट संपूर्ण जगात ब्लाॅकबस्टर ठरले आहेत. ते कशी लक्झरी लाइफ जगण्याचा आनंद घेतात, हे जाणून घेवुयात. 

जगात अनेक देशात बंगले (Bungalows in Many Countries in the World)

दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचे जगातील अनेक देशात बंगले आहेत. 68 वर्षाच्या या दिग्दर्शकाचे मूळ घर न्यूझीलंड येथे असल्याचे ते सांगतात. या देशात येण्यापूर्वी ते कॅलिफोर्नियातील मालिबूतील एका आलिशान बंगल्यात राहत होते. 8 हजार स्क्वेअर फूट असणाऱ्या या बंगल्यात 6 बेडरूम व 7 बाथरूम आहेत. याव्यतिरिक्त या बंगल्यात एक गेस्ट हाऊस, स्विमिंग पूल व टेनिस कोर्टदेखील आहे. 2012 मध्ये त्यांनी  न्यूझीलंड येथे अवतार चित्रपट दिग्दर्शित केल्यानंतर तिथेच एक घर व शेती विकत घेतली होती. 3700 एकर जमिनीवर यांचा बंगला असून येथे एक फार्मसह अनेक सुख-सुविधादेखील आहेत.

वायनरी कंपनीचे मालक (Owner of a Winery Company)

जेम्स कॅमेरून यांची एक वायनरी नावाची स्वत:ची कंपनी आहे. ही कंपनी दहा प्रकारचे विविध वाइन तयार करते. त्यांची ही कंपनी कॅनडाच्या ब्रिटिश कोलमंबियात आहे. 84 एकरावरील ब्लूफोर्ट वाईनयार्ड अॅन्ड इस्टेट नावाची ही वायनरी कपंनी त्यांनी साधारण 23 कोटी रुपयांत खरेदी केली होती.  जेम्स कॅमेरून यांनी एक सबमरीन विकत घेतली होती. टायटॅनिक चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान त्यांनी सुमारे 24 कोटी रूपयांत ही विकत घेतली समुद्रातील जग एक्सप्लोअर करण्यासाठी त्यांनी हे सबमरीन खरेदी केले. याव्दारे त्यांनी अनेक चित्रपटात अंडरवॉटर सीन्सदेखील शुट केले आहेत. 

महागडया गाडया व घडयाळे (Expensive cars and Watches) 

जगातील सर्वात वेगवान असणारी बाइक त्यांच्याजवळ आहे. या बाइकचे नाव ‘दुकाटी 848’ (Ducati 848) आहे. तसेच त्यांच्याकडे तीन ‘हार्ले डेव्हिडसनच्या बाइक्स’ (Harley Davidson Bikes) आहेत. तर कारमध्ये त्यांच्याजवळ ‘मर्सिडिज बेन्झपासून ते कार्व्हेट सी 6 कन्व्हर्टेबल’ (From Mercedes Benz to Corvette C6 Convertible)पर्यंतच्या एक ना एक अशा अलिशान कार आहेत. तसेच ते ‘रोलेक्स’ (Rolex) या महागडया घडयाळाचेदेखील मोठे फॅन आहेत.