सणासुदीच्या काळात सजावटीसाठी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यामुळे फुलांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ होते. मात्र, यंदाच्या सणउत्सव काळात फुलांची मागणी घटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाजार उपलब्ध असेली प्लास्टिकची कृत्रिम रंगीबेरंगी फुले (Artificial Flowers) हे ठरत आहे. नागरिकांकडून बाजारात मोठ्या प्रमाणात या कृत्रिम फुलांची मागणी वाढल्याने नैसर्गिक फुलांच्या मागणीत घट झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गालाही मोठा फटका बसला आहे.
फुलांचे दर कमीच
प्रतिवर्षी सण उत्सवाच्या काळात जर्बेरा, झेंडू, शेवती, लिली, गुलाब या फुलांना मार्केटमध्ये मोठी डिमांड असते. त्यामुळे शेतकरीही सण उत्सवामध्ये ही फुले विक्रीस उपलब्ध होतील, असे नियोजन करून फुलांची लागवड करत असतो. सध्या गौरी-गणपतीचा उत्सव सुरू आहे. त्या निमित्ताने बाजारात फुलांची मोठ्या प्रमाणात फुलांची आवक होत आहे. मात्र, यावर्षी शेतकऱ्यांना अपेक्षेप्रमाणे दर मिळत नसल्याची परिस्थिती दिसून येत आहे. सोलापूर, मुंबई, पुणे ,नाशिक, कोल्हापूर या ठिकाणच्या बाजारपेठेत फुलांना मोठी मागणी असते, मात्र यंदा या मागणीत घट झाली आहे. बाजारात सध्या झेंडूला 30 ते 50, गुलाब फूल गड्डीसाठी 20 ते 30 रुपये, जर्बेराला 30 रुपये गड्डी, लिली 20 रुपये बंडल असे दर मिळत आहेत. याशिवाय मागणीतही घट झाली आहे. एरव्ही सणासुदीच्या काळात हे भाव दुपट्ट होत असल्याचा अनुभव सोलापूर येथील फुले व्यापाऱ्यांनी सांगितला.
कृत्रिम फुलांच्या मागणीत वाढ
नैसर्गिक फुलांची मागणी घटण्यामागे बाजारात उपलब्ध असलेली प्लास्टिकची कृत्रिम फुले कारणीभूत ठरत आहेत. प्रत्येक बाजारपेठा या प्लास्टिक फुले, हार, तुरे, माळा यांनी सजलेल्या दिसून येत आहेत. अलीकडच्या काळात नागरिकांची या कुत्रिम फुलांच्या खरेदीचा कल वाढला आहे. ही फुले नैसर्गिक फुलांच्या तुलनेत सजावटीसाठी देखील आकर्षक आणि टिकावू आहेत. त्यामुळे नागरिक या फुलांची मोठ्या प्रमाणात खरेदी करत आहेत. बाजारात सध्या अशा प्रकारच्या कृत्रिम फुलांचे हार हे 60 रुपयांना जोडी, तसेच मोठे हार, आकर्षक रंगीबेरंगी माळा या 100 रुपयांपासून 250 रुपयापर्यंत उपलब्ध होत आहेत. शिवाय या दिर्घ काळापर्यंत वापरात येत असल्याने नागरिकांकडून नैसर्गिक फुलांऐवजी कृत्रिम फुलांच्या खरेदीला प्राधान्य दिले जात आहे.
मागणी नसल्याने फुलांचे कचऱ्यात ढीग
सध्या सणासुदीमुळे शेतकरी बाजारात मोठ्या प्रमाणात फुले घेऊन येत आहेत. फुलांची आवकही वाढली आहे. मात्र, ग्राहकांकडून मागणी होत नसल्याने फुलांचे उठाव होईनात परिणामी फुले कचऱ्यात फेकून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान, दादरच्या फूल बाजारात फुलाना मागणी नसल्याने कचऱ्यामध्ये फुलाचे ढीग लागल्याचे वृत्त हिदूस्थान टाईम्सने दिले आहे. त्यांच्या वृत्तानुसार दादर मार्केटमधील तब्बल 90 टन फुले मागणी नसल्याने कचऱ्यात फेकून देण्यात आली आहेत.
शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही फटका
नागरिकांची कृत्रिम फुलांची खरेदी करण्याला पसंती दिली जात आहे. परिणामी ऐन सणासुदीत फुल उत्पादक शेतकऱ्यांची चांगला दर न म शेतकरी वर्गाला मचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच व्यापारी वर्गालाही यंदा मागणीत घट झाल्याने आर्थिक फटका बसला आहे.