Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : आठवडाभरात झाली 50 कोटींची इंधन बचत, कुणाची आणि कशी ते घ्या जाणून

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg

Image Source : www.swarajyamag.com

Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg : पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. सोबतचं व्यापाऱ्यांचाही वाहतूकीचा खर्च वाढतो. पर्यायाने त्याचा बोजा हा ग्राहकांवरचं पडतो. मात्र हा प्रोजेक्ट मार्गी लागल्याने वेळेची आणि पर्यायाने पैशाचीही बचत झाली आहे. आठवडयाभरात 50 कोटी रुपये वाचले आहेत. कुणाचे आणि कसे ते जाणून घेऊया.

एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांना याचा फटका बसतो आहे. सोबतचं व्यापाऱ्यांचाही वाहतूकीचा खर्च वाढतो. पर्यायाने त्याचा बोजा हा ग्राहकांवरचं पडतो. मात्र Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg हा प्रोजेक्ट मार्गी लागल्याने वेळेची आणि पर्यायाने पैशाचीही बचत झाली आहे. कशी ते जाणून घेऊया.

43 हजार वाहने, 50 कोटी रुपयांची झाली बचत 

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग (Nagpur-Mumbai Samruddhi Mahamarg) शिर्डीपर्यंत वाहतुकीसाठी खुला झाला आहे. यानंतर  या महामर्गाावरून आठवडाभरामध्ये  साठ हजार वाहने धावली , असे  रस्ते विकास महामंडळातर्फे सांगण्यात आले आहे. या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी दरम्यान 100 किलोमीटर अंतर कमी झाले. यामुळे  आठवडाभरामध्ये  जवळजवळ  ५० कोटी रुपयांच्या इंधनाची बचत झालेली  आहे. त्याचबरोबर  या महामार्गामुळे नागपूर ते शिर्डी या प्रवासात सहा तासांची बचत झाली आहे. दरम्यान,  आठवड्याभरात  या महामार्गावरून 43  हजार वाहनांनी प्रवास केला आहे.

समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg)) मुंबई ते नागपूर अंतर 710 किलोमीटर आहे.  त्यापैकी 570  किलोमीटरचा नागपूर ते शिर्डी टप्पा वाहतुकीसाठी खुला झालेला  आहे. या महामार्गावरून आठवडाभरात बरीचशी  वाहने शिर्डी, औरंगाबाद,  जालन्यापर्यंत धावली. औरंगाबाद, जालना इथूनही  शिर्डीचे अंतर 100  किलोमीटर इतके  कमी झाले आहे.  या महामार्गावरून दिवसाला 6 हजारपेक्षा जास्त  वाहने धावत असल्याचे, रस्ते विकास महामंडळाकडच्या  आकडेवारीतून समोर आलेले  आहे. या महामार्गामुळे 100  किलोमीटर अंतर कमी झाल्याने या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांची 50 कोटी रुपयांची इंधन बचत झाली.

वेळही वाचतोय

शिर्डी ते नागपूरदरम्यानच्या पूर्वीच्या प्रवासाचा कालावधी  बारा तास इतका होता. ही वेळ  समृद्धी महामार्गामुळे (Samruddhi Mahamarg)आता 6 तासांवर आली आहे.   समृद्धी महामार्गावरून जाण्यासाठी शिर्डी ते नागपूर या टप्प्यातील अंतरात 'लाइट वेट' आणि कार प्रकारातील वाहनांच्या  एकेरी प्रवासासाठी जवळपास 900 रुपये टोल द्यावा लागत आहे. मुंबईपर्यंत थेट प्रवास करायचा झालास ही रक्कम 1200  रुपये होणार आहे.

समृद्धी महामार्गावर महामार्गावर लहान वाहनांना 1  रुपये 65  पैसे प्रत्येक किलोमीटरला टोल आकारला जाईल. जड वाहनांना हलक्या वाहनांपेक्षा तीनपट अधिक टोल भरावा लागणार आहे . हलक्या व्यावसायिक वाहनांसाठी (मिनी बस) 2 रुपये 79 पैसे, बस- ट्रकसाठी 5  रुपये 85 पैसे, अवजड यंत्रसामग्रीसाठी 9  रुपये १८ पैसे, अतिअवजड वाहनासाठी 11  रुपये 17  पैसे प्रत्येक किलोमीटरला टोलदर निश्चित करण्यात आलेला  आहे.