How to Get Cheap Flight Rates: स्वस्तात विमान प्रवास करा, स्वप्न पूर्ण करा. यासाठी फक्त खालील आइडिया विचार करा. या आइडिया तुम्हाला नक्कीच विमान प्रवास करण्यास मदत करेल. जेणेकरून आपल्याला स्वस्तात विमानाचे तिकिट मिळेल व आपली पैशांची बचतदेखील होईल. सोबतच विमान प्रवासदेखील घडून येईल.
Table of contents [Show]
वेळेचे योग्य नियोजन
जर आपल्याला कोणत्या कार्यक्रम किंवा पर्यटनासाठी परदेशात किंवा परराज्यात जायचे असेल, तर यासाठी एखादी तारीख नक्कीच फिक्स केलेली असते. या तारखेच्या दोन ते तीन महिन्यांपूर्वी विमानाचे तिकिट बुक करावे. जितक्या लवकर तिकिट बुक कराल, तितक्या कमी किंमतीत तुम्हाला विमानाचे तिकिट मिळेल. यासाठी वेळीची योग्य सांगड घालून विमानाचे तिकिट कमी दरात खरेदी करा.
शक्यतो शासकीय सुट्टयांदिवशीचे नियोजन टाळा
स्वस्तात विमान प्रवास करायचे असेल, तर शासकीय सुट्टया म्हणजेच सण-सुद असेल त्यादिवशीचे तिकिट बुक करू नका. कारण यादिवशीचे तिकिटाचे दर जास्त असतात. कारण सुट्टयादिवशी प्रवाशांची अधिक गर्दी असल्याने स्वस्त दरात तिकिट मिळणे कठीण असते. सोबतच वीकेंडला ही विमान तिकिटाच्या किंमती जास्त असतात, त्यामुळे विमान प्रवास कमी किंमतीत करण्याचे नियोजन कधी ही वीकेंडला करू नका. ज्यादिवशी काही विशेष नसेल, अशाच वेळी स्वस्तात विमान प्रवास करण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल.
ऑफरमध्ये तिकिट खरेदी करा
तुम्ही सोशल मिडियावर इंडिगो (Indigo), एअर इंडिया (Air-India), स्पाइस जेट (SpiceJet) अशा अनेक एअस लाइन्स कंपन्याना फाॅलो करा. जेणेकरून तुम्हाला विविध एअर लाइन्सच्या तिकिटांवर काय-काय ऑफर सुरू आहे, याची माहिती मिळेल. त्यामुळे तुम्हाला ऑफर, डिस्काउंटमध्ये अगदी स्वस्तात विमान प्रवास करता येईल.
शक्यतो स्वस्तातील एयर लाइन्सची निवड करा
सध्या प्रत्येक क्षेत्रात खूप स्पर्धा सुरू आहेत. यामध्ये एयर लाइन्स तरी कशी मागे राहतील. म्हणूनच प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी अनेक एयर लाइन्स कमीत कमी किंमतीत प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करित असतात. त्यामुळे येथे विमान तिकिटांचे दरदेखील सतत वर-खाली होत असल्याचे पाहायला मिळते. यासाठी तुम्हाला विविध एयर लाइन्सच्या वेबसाइटवर सतत अपडेट राहावे लागेल.
ग्रुपमध्ये तिकिट कधी बुक करू नये
विमानाचे तिकिट कधी बुक करत असाल, तर बिलकुल ग्रुपमध्ये तिकिट बुक करू नका. कारण अशा वेळी विविध विमान कंपन्या अधिक दराचे तिकिट दर्शवितात. कारण त्यांना तिकिटांची जास्तीत जास्त विक्री करायची असते. तत्पुर्वी एका व्यक्तीसाठी तिकिटची किंमत काय दाखविते हे तपासून पहा. मगच स्वस्तातील विमानाचे तिकिट खरेदी करा.
अशा पध्दतीने आपले विमान प्रवास करण्याचे स्वप्न पूर्ण करा, ते ही अगदी स्वस्तात!