LIC Insurance Benefits : तुम्ही नोकरी करा किंवा स्वत:चा व्यवसाय करा, बचत फार गरजेचे आहे. जर आपण आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही बचत करण्याचा विचार करीत असाल, तर विमा पॉलिसी काढणे हा एक चांगला पर्याय आहे. बचतीसह तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी चांगली विमा योजना घेणे देखील आवश्यक आहे. परंतु, विमा योजना घेतांना कोणती विमा योजना चांगली? कोणत्या विमा योजनेत गुंतवणूक करावी? ही माहिती तुम्हाला आज सांगणार आहोत.
Table of contents [Show]
एलआयसीची जीवन अमर पॉलिसी
ज्यांना कमी किमतीचा विमा पर्याय पाहिजे आहे, त्यांच्यासाठी एलआयसी जीवन अमर योजना खूप चांगली आहे. ही पॉलिसी एका ठराविक कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. ज्यांना उच्च विमा रकमेसह कमी किमतीचा विमा पर्याय हवा आहे, त्यांच्यासाठी ही पॉलिसी अतिशय योग्य आहे. जीवन अमर योजना पॉलिसीचा मुदत कालावधी 10 ते 40 वर्षांच्या दरम्यान असू शकते. तर पॉलिसी काढणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असले पाहिजे. या पॉलिसीचे मँच्युरिटी वय 80 वर्षे आहे. पॉलिसीच्या रक्कमेची मर्यादा 25 लाख रुपये आहे.
एलआयसी टेक टर्म प्लॅन पॉलिसी
एलआयसी टेक टर्म प्लॅन ही एक मुदत विमा योजना आहे. ही पॉलिसी विशिष्ट कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करते. ज्यांना उच्च विमा रक्कमेसह कमी किमतीची विमा योजना हवी आहे. त्यांच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही पॉलिसी काढणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 65 वर्षे असले पाहिजे. पॉलिसीचा मुदत कालावधी 14 ते 40 वर्षांचा असू शकतो. या पॉलिसीचे मँच्युरिटी वय 80 वर्षे आहे. एलआयसी टेक टर्म प्लॅन पॉलिसीच्या कव्हरेजची (मूळ विमा रक्कम) किमान मर्यादा 50,00,000 लाख रुपये आहे, तर कमाल मर्यादा दिलेली नाही.
एलआयसी न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक प्लॅन
एलआयसीची न्यू चिल्ड्रेन्स मनी बॅक ही एक मनी-बॅक चाइल्ड प्लॅन आहे, जी एक आर्थिक सुरक्षा प्रदान करते. ज्या पालकांना त्यांच्या मुलांचे भविष्य सुनिश्चित करायचे आहे, त्यांच्यासाठी हा एक योग्य प्लॅन आहे. या योजनेची पॉलिसी मुदत 25 वर्षे आहे. ही पॉलिसी धारक कुठल्याही मुलांचे वय कमीत कमी 0 वर्ष आणि जास्तीत जास्त 12 वर्षे असले पाहिजे. पॉलिसीच्या कव्हरेजची किमान मर्यादा 1 लाख रुपये आणि तर कमाल मर्यादा दिलेली नाही.
एलआयसीची नवीन जीवन आनंद पॉलिसी
एलआयसीची नवीन जीवन आनंद पॉलिसी ही एंडॉवमेंट योजना विमा संरक्षण आणि बचत या दोन्ही संधी प्रदान करते. ज्यांना आपले भविष्य सुरक्षित करुन भविष्यासाठी पैसे वाचवायचे आहेत, त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे. ही पॉलिसी काढणाऱ्या कुठल्याही मुलाचे वय 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान असावे. पॉलिसीचा कालावधी 15 वर्षांपासून 35 वर्षांपर्यतचा आहे. पॉलिसीचा कालावधी असेल तितकाच प्रीमियमचा कालावधी असणार आहे. पॉलिसीच्या कव्हरेजची किमान मर्यादा 1 लाख रुपये आणि तर कमाल मर्यादा दिलेली नाही. या पॉलिसीचे मँच्युरिटी वय 75 वर्षे आहे.
एलआयसीची जीवन उमंग पॉलिसी
एलआयसीच्या जीवन उमंग पॉलिसीमध्ये 15,20,25 किंवा 30 वर्षांसाठी गुंतवणूक करु शकता. ही एक एंडॉवमेंट पॉलिसी आहे, जी बचतीच्या लाभासह विमा संरक्षण देते. या पॉलिसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर ग्राहकाच्या खात्यात दरवर्षी ठराविक रक्कम येते. याशिवाय पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला एकरकमी रक्कम दिली जाते. ही पॉलिसी 100 वर्षांपर्यंत कव्हरेज देते. 90 दिवसांपासून ते 55 वर्षांपर्यंतचे लोक LIC ची जीवन उमंग पॉलिसी घेऊ शकतात. विम्याची रक्कम 2 लाख रुपयांपासून पूढे कितीही जास्त असू शकते.