दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या महागाईत सर्वसामान्यांना टिकून राहणे कठीण झाले आहे. जवळ-जवळ सर्वच वस्तू आणि सेवांच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यात शेअर बाजारात रुपयांची घसरण ही चिंता वाढवत आहे. अशा आर्थिक अडचणीच्या वेळी प्रत्येकाच्या डोक्यात येते नोकरी व्यतिरिक्त कुठून तरी दुसरा उत्पन्नाचा मार्ग शोधावा. पण नेमकं काय करावं हे कळत नाही. यासाठी आम्ही आज पॅसिव्ह उत्पन्नाचे (Passive Income) काही पर्याय आपल्याला सांगणार आहे.
पॅसिव्ह उत्पन्न म्हणजे काय? What is passive income?
पॅसिव्ह इन्कम म्हणजे तुम्ही सक्रियपणे काम न करता किरकोळ कामातून मिळवलेलं उत्पन्न होय. जे उत्पन्न तुम्ही सक्रियपणे काम न करता तुमच्या असलेल्या किंवा निर्माण केलेल्या संपत्ती किंवा गुंतवणुकीच्या माध्यमातून कमावू शकता ते, यासाठी तुम्हाला सक्रियपणे काम करत राहण्याची गरज नसते. तुम्हाला पॅसिव्ह उत्पन्न (Passive Income) मिळवायचे असेल तर तुम्ही स्वतः अशी संपत्ती निर्माण करणं फार गरजेचं आहे. जिच्या विनियोगातून तुम्हाला प्रत्यक्ष काम न करता, त्यातून पैशांची आवक होत राहील. अशा संपत्तीचे स्रोत बनवण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत; पण यासाठी तुम्हाला थोडी मेहनत आणि वेळ द्यावा लागेल.
मालमत्ता भाड्याने देणे (Rental Properties)
तुमच्याकडे पैसे असल्यास, भाड्याने मिळणाऱ्या उत्पन्नासाठी घर किंवा इतर रिअल इस्टेट खरेदी करणं, यातून पॅसिव्ह उत्पन्न मिळवू शकता. आपली मालमत्ता भाडयाने देऊन तुम्ही कायमचे पॅसिव्ह उत्पन्न निर्माण करू शकता. यात फक्त तुम्हाला मालमत्तेची देखभाल करणे, मालमत्ता कर वेळेवर भरणे आदी गोष्टी नियमितपणे करणे गरजेचे आहे. घर, दुकान, बँक्वेट हॉल खरेदीकरून भाड्याने दिल्यास त्यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता.
स्टॉक फोटो विकणे (Selling stock photos)
तुम्हाला फोटोग्राफीचा छंद असल्यास, अनुभवी व्यावसायिक किंवा पूर्णवेळ छायाचित्रकार असल्यास, तुम्ही ऑनलाईन स्टॉक फोटो (Online Stock Photos) विकून पैसे कमवू शकता. स्टॉक फोटो साईट्स जसे की Getty Images, Shutterstock, iStock सारख्या कंपन्या किंवा व्यक्तींना तुमच्या फोटोचे हक्क देऊन पैसे कमवतात. बदल्यात, तुम्हाला नफ्याचा एक भाग मिळतो. मात्र, अशा कंपन्या किंवा प्लॅटफॉर्म निवडताना, त्याचे नियम, परवाना रचना आणि संभाव्य ग्राहकांचा विचार करा.
अॅप तयार करा (Create an APP)
जर तुम्ही डेव्हलपर किंवा प्रोग्रामर असाल, तर तुम्ही ॲप्लिकेशन्स बनवण्याचा विचार करू शकता. यासाठी तुम्ही दोन पद्धतींचा वापर करू शकता. पहिला पर्याय म्हणजे, तुमचे सॉफ्टवेअर किंवा अॅप खरेदी करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी तुम्ही शुल्क आकारू शकता. दुसरे, तुम्ही तुमचे सॉफ्टवेअर/अॅप मोफत बनवू शकता आणि जाहिरातींद्वारे त्यावरून कमाई करू शकता.
डिलिव्हरी पार्टनर बना (Become a Delivery Partner)
सतत वाढत असलेल्या फूड डिलेव्हरीच्या सोयीसुविधांमुळे Zomato, Swiggy सारख्या कंपन्यांना नेहमी डिलिव्हरी पार्टनरची (Delivery Partner) आवश्यकता असते. डिलिव्हरी पार्टनर असल्याने, तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या डिलिव्हरी कामाचे तास निवडू शकता. ह्या कंपन्या सामान्यतः डिलिव्हरीच्या संख्येसाठी आणि प्रत्येक डिलिव्हरीसाठी कमिशन पद्धतीने पैसे देतात.
ब्लॉगिंग करा (Blogging)
ब्लॉगिंग हा पॅसिव्ह उत्पन्नाचा सर्वात सोपा स्त्रोत आहे. एक यशस्वी ब्लॉग तयार करण्यासाठी सुरुवातीला थोड्या प्रयत्नांची आवश्यकता आहे. ब्लॉगिंगच्या माध्यमातून अफिलिएट मार्केटिंग, कोर्सेस विकणे, स्पॉन्सर्ड पोस्ट, पुस्तक विक्री आणि इतर माध्यमांद्वारे पॅसिव्ह इन्कम निर्माण करण्यास मदत होते. म्हणून, जर तुम्ही झोपेत पैसे कमावण्याचे साधन शोधत असाल, तर ब्लॉगिंग हे उत्तर असू शकते. ब्लॉग सुरू करण्यासाठी, तुम्हाला कोणत्याही डिझाईन किंवा कोडिंगची आवश्यकता नाही. साधे साईट बिल्डर्स आणि होस्टिंग सेवा जसे की Hostinger व इतर कंपन्यांच्या मदतीने तुम्ही सहजपणे ब्लॉगिंग सुरू करू शकता.
पॅसिव्ह उत्पन्नासाठी या पर्यायाव्यतिरिक्त आणखी बरेच पर्याय आहेत. आपल्याला काय जमेल याचा विचार करून तुम्ही सहज पॅसिव्ह उत्पन्नासाठी (Passive Income) प्रयत्न करू शकता.