सध्या मार्केटमध्ये अनेक नवनवीन कंपन्यांचे टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. अनेक नवीन कंपन्या आधुनिक फीचर्स सोबत नवीन टीव्ही लॉन्च करत आहेत. पूर्वीच्या टीव्हीची साईज अगदी छोटी होती. मात्र आता मोठ्या आकाराच्या आणि कमी जाडीच्या टीव्ही उपलब्ध आहेत. मोठ्या आकाराच्या टीव्हीवर कार्यक्रम पाहायला देखील खूप मजा येते. या टीव्हीला आपण 'लार्जर दॅन स्क्रीन' असं देखील म्हणू शकतो.
सध्या फ्लिपकार्टवर अनेक गोष्टींवर मोठा डिस्काउंट दिला जात आहे. जर तुम्हालाही तुमच्या घरामध्ये मोठ्या आकाराचा टीव्ही खरेदी करायचा असेल, तर 'Vu Premium TV' एक उत्तम ऑप्शन आहे. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर (Flipkart) या टीव्हीच्या खरेदीवर 42 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट देण्यात येत आहे. त्यासोबतच ग्राहकांना अनेक बँक ऑफरचा लाभ घेता येईल. या ऑफरचा लाभ तुम्ही कसा घेऊ शकता, जाणून घेऊयात.
फ्लिपकार्टवर मिळेल 'इतका' डिस्काउंट
ऑनलाइन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर 'Vu Premium TV' विक्रीसाठी उपलब्ध आहे. या टीव्हीची साईज 108 सेमी म्हणजेच 43 इंच इतकी आहे. फुल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉईड प्रकारामध्ये या टीव्हीची विक्री केली जाते. ज्याची मूळ किंमत 35,000 रुपये आहे. ज्यावर 42 टक्क्यांचा डिस्काउंट देण्यात येत आहे. या डिस्काउंटनंतर या टीव्हीची किंमत 19,999 रुपये होते. त्यासोबतच ग्राहकांना अनेक बँक ऑफरचा लाभ देखील घेता येणार आहे.
बँक ऑफर्सबाबत जाणून घ्या
एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डवरून ग्राहकांनी या टीव्हीची खरेदी केली, तर त्यांना त्वरित 10 टक्क्यांचा डिस्काउंट मिळणार आहे. तसेच फ्लिपकार्ट ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (Flipkart Axis Bank Credit Card) खरेदी केल्यानंतर ग्राहकांना 5% कॅशबॅक मिळणार आहे.
याशिवाय एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (HDFC Bank Credit Card) जर ग्राहकांनी ईएमआय (EMI) स्वरूपात हा टीव्ही खरेदी केला, तर त्यांना 1250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा टीव्ही ग्राहक ईएमआय स्वरूपात देखील खरेदी करू शकतात. मासिक 704 रुपयांचा ईएमआय भरून हा टीव्ही खरेदी करता येईल.
'Vu Premium TV' चे फीचर्स जाणून घ्या
'Vu Premium TV' चे साऊंड आऊटपुट 24W असून रिफ्रेश रेट 60Hz इतका आहे. या टीव्हीचे रिझोल्युशन 1920 x 1080 पिक्सल आहे. या टीव्हीचा आकार 108 सेमी म्हणजेच 43 इंचाचा आहे. ही टिव्ही नेटफ्लिक्स, डिज्नी हॉटस्टार आणि Youtube सारख्या ॲप्सला सपोर्ट करणार आहे. कंपनीकडून ग्राहकांना 7 दिवसाची रिप्लेसमेंट सर्व्हिस (Replacement Service) मिळणार आहे. यामध्ये कंपनीने आयपीएस (IPS) पॅनल टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे.
Source: navbharattimes.indiatimes.com