Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BLS International Services: कंपनीच्या शेअर्समध्ये वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढ!

BLS International Services Ltd

BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभाग.

BLS International Services Ltd: टेक्न्लॉजी बेस सर्व्हिस प्रोव्हायडर बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस (BLS) कंपनी युनिकॉर्नच्या यादीत सहभागी झाली. या कंपनीने या आठवड्यात 1 अब्ज डॉलरचा पल्ला पार केला आहे. या वर्षभरात बीएलएस कंपनीच्या शेअर्सने 300.57 टक्के परतावा दिल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी म्हणजे 2021 मध्ये बीएलएस इंटरनॅशनलच्या शेअरची किंमत 48.93 रुपये होती. ती आज (दि.16 डिसेंबर, 2022) 196 रुपयांवर पोहोचली आहे. 

bls international services ltd share price-1
Chart Source: Google.co.in

बीएलएस इंटरनॅशनलचा युनिकॉर्नमध्ये सहभाग!

स्टार्टअप कंपनी म्हणून सुरू झालेल्या बीएलएस इंटरनॅशनल सर्व्हिसेस कंपनीचा युनिकॉर्नच्या यादीत सहभागी झाला आहे. बीएलएसने या आठवड्यात 1 अब्ज डॉलरचा टप्पा पार केला आहे. कंपनीच्या या प्रगतीबरोबरच कंपनीचा शेअर्सही गेल्या वर्षभरात 300 टक्क्यांनी वाढला आहे.

कंपनीच्या नफ्यात 70 टक्क्यांनी वाढ!

2022-23 या आर्थिक वर्षातील पहिल्या 6 महिन्यात कंपनीचा नफा 70.6 टक्क्यांनी वाढून तो 630 कोटी रुपयांवर पोहोचला. या दरम्यान कंपनीला निव्वळ 71 टक्क्यांचा नफा झाला असून कंपनीच्या उत्पन्नात 81.69 कोटी रुपये जमा झाले आहेत. सध्या बीएलएसकडे जागतिक पातळीवर 27 हजारांहून अधिक केंद्रांचे नेटवर्क कार्यरत आहे. कंपनीमध्ये सध्या 20 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.

बीएलएस कंपनी काय काम करते?

बीएलएस ही दिल्लीस्थित कंपनी असून त्याची स्थापना 2005 मध्ये करण्यात आली होती. ही कंपनी सरकार आणि जगभराती दूतावासांशी (Embassy) संबंधित सेवा पुरवण्याचे काम करते. कंपनीच्या सेवांमध्ये व्हिसा, पासपोर्ट, कॉन्सुलर, सिटीझन, ई-गव्हर्नन्स, अटेस्टेशन, बायोमेट्रिक, ई-व्हिसा यांचा समावेश आहे.