Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Retirement Planning: 24 टक्के भारतीय निवृत्तीनंतरच्या सुखी आयुष्यासाठी करतात गुंतवणूक; अभ्यासातून माहिती समोर

Retirement Planning

Retirement Planning: भारतीय लोक नोकरीच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असतात, त्यातील केवळ 24 टक्के भारतीय लोक त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार करतात.

Retirement Planning: लोक नोकरी करताना वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि निवृत्तीच्या दरम्यान अनेक जणांचे रिटायरमेंटचे प्लॅन्स ठरतात. मात्र, अजूनही काही जणांच्या टॉप प्रायोरिटी लिस्टमध्ये(top priority list) रिटायरमेंट प्लॅनिंग(Retirement Planning) नाहीये असं मॅक्स लाइफ इन्शुरन्स(Max Life Insurance) आणि इंडिया रिटायरमेंट इंडेक्सने(India Retirement Index) नुकत्याच केलेल्या अभ्यासातून समोर आलं आहे. 
नोकरीच्या काळात विविध योजना(schemes) आणि पॉलिसींमध्ये(policies) गुंतवणूक करत असताना, केवळ 24 टक्के भारतीय लोक त्यांच्या सेवानिवृत्त जीवनासाठी बचतीचा विचार करतात असे मॅक्स लाइफ इन्शुरन्स व इंडिया रिटायरमेंट इंडेक्सने केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. यासाठी नोव्हेंबर 2021 मध्ये भारतातील 28 वेगवेगळ्या शहरांमध्ये 35-65 वर्षे वयोगटामध्ये यासंदर्भातील अभ्यास करण्यात आला होता.

निवृत्तीसाठी बचतीचे नियोजन का करावे?

या संदर्भात मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत त्रिपाठी(Prashant Tripathi) सांगतात की, “जसं वय वाढतं त्यानुसार आरोग्याच्या समस्या सुद्धा वाढतात. त्याचप्रमाणे अलीकडच्या काळातील आर्थिक दृष्ट्या कमी वेतन वाढ, आर्थिक अनिश्चितता आणि नोकऱ्यांचे होणारे नुकसान यांसारखे प्रमाण वाढत चालले आहे. परिणामी वैयक्तिक व घरगुती उत्पन्नावर याचा परिणाम होतो. म्हणूनच लोकांनी  रिटायरमेंटचे प्लॅनिंग(Retirement Planning) करणे गरजेचे आहे.या अभ्यासात असे आढळून आले आहे की भारताचा सेवानिवृत्ती निर्देशांक अभ्यास (IRIS) 44 वर आहे, ज्यामध्ये आरोग्य , आर्थिक स्थिती आणि भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

निवृत्तीसाठी बचत करण्याचा उद्देश  

जे लोक निवृत्तीसाठी गुंतवणूक करतात, त्यापैकी 60 टक्क्यांहून अधिक लोक आरोग्य आणि वैद्यकीय खर्चासाठीच गुंतवणूक करतात
63 टक्के लोकांनानिवृत्ती दरम्यान वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीसाठी बचत करणे महत्त्वाचे वाटते, तर क्वचितच 8 टक्के लोकांनी केवळ भावनिक आधारासाठी गुंतवणूक केल्याचे अभ्यासात समोर आले आहे
‘आर्थिक गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहता कामा नये’ म्हणून 47 टक्के भारतीय यासाठी गुंतवणूक करतात, तर 38 टक्के ‘निवृत्ती दरम्यान उत्तम जीवनशैली उपभोगण्याच्या’ उद्देशाने गुंतवणूक करतात

आरोग्य तपासण्यांकडे दुर्लक्ष

बऱ्याच शहरांमध्ये निवृत्तीसाठी आर्थिक तयारी कमी प्रमाणात आहे. जरी, निवृत्त जीवनातील सर्वात गंभीर पैलू म्हणून आरोग्य ओळखले गेले असले तरी, बऱ्याच सर्वेक्षणकर्त्यांनी गेल्या तीन वर्षांत स्वतःच्या आरोग्याची तपासणीच केलेली नाही. 41-45 वयोगटातील लोकांमध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणा पाहायला मिळाली.