Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Hyundai Verna Launch: न्यू ह्युंदाई वेरना 'या' तारखेला होणार लाँच; लूक अन् फिचर्स असे की गाडीच्या प्रेमात पडाल

New Hyundai Verna

बहुचर्चित ह्युंदाई वेरना गाडी लवकरच नव्या रुपात ग्राहकांच्या समोर येणार आहे. 21 मार्चला गाडी भारतात लाँच करण्याची घोषणा कंपनीने केली आहे. डिझाइन, इंजिन आणि फिचर्समध्ये ही गाडी जुन्या वेरना मॉडेलपेक्षा सरस असणार आहे. सेदान श्रेणीतील या गाडीमध्ये अनेक अत्याधुनिक फिचर्स देण्यात आली आहेत.

New Hyundai Verna: बहुचर्चित ह्युंदाई वेरना गाडी लवकरच नव्या रुपात ग्राहकांच्या समोर येणार आहे. 21 मार्चला गाडी भारतात लाँच होणार असल्याची घोषणा कंपनीने केली. डिझाइन, इंजिन आणि फिचर्समध्ये ही गाडी जुन्या वेरना मॉडेलपेक्षा सरस असणार आहे. मारुती सुझुकीची सियाझ, व्होक्सवॅगची Virtus, स्कोडाची Slavia आणि होंडासीटी या गाड्यांना वेरना टक्कर देईल.

सेदान श्रेणीतील गाड्यांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. नवी वेरना गाडी ग्राहकांच्या पसंतीस उतरते की नाही, हे येणारा काळच ठरवेल. नुकतेच कंपनीने 25 हजार रुपये भरून गाडीची बुकिंग सुरू केली आहे. वेरनाच्या नवीन मॉडेलची (Hyundai Verna price) एक्स शोरुम किंमत 10 लाख 50 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. या गाडीच्या नव्या मॉडेलबद्दल चाहत्यांमध्ये मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. 

न्यू ह्युंदाई वेरनामधील फिचर्स (New Hyundai Verna Features) 

या गाडीमध्ये LED हेडलाइट्स देण्यात आली आहे. तसेच बोनेटवर संपूर्ण डे टाइम रनिंग लाइट (DRL) देण्यात आली आहे.

गाडीच्या मागच्या बाजूनेही DRL लाइट्स टेल लँपला जोडून देण्यात आली आहे.

इंजिनचे पर्याय ग्राहकांकडे असतील. 1.5 लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन मॅन्युअल गिअर बॉक्ससह असेल. तसेच 1.5 लिटर क्षमतेचे turbocharged GDi पेट्रोल इंजिनचा पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

गाडीमध्ये लार्ज टचस्क्रिन इन्फोटेनमेंट युनिट देण्यात आले आहे. तसेच स्मार्टफोन कनेक्टिव्हीटी, सनरुफ, ऑटो एसी, हेडलाइट्स, व्हेंटिलेटेड सिट्स, मागे घेता येतील असे रिक्लाइनेबल बॅक सिट, डिजिटल कॉकपिट, वायरलेस चार्जिंगसह इतरही अनेक फिचर्स देण्यात आली आहेत.

चार आणि सहा एअरबॅग्जमध्ये मॉडेल उपलब्ध असेल. स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा सेन्सर, ISOFIX child सीट अँकर्स देण्यात आले आहे.

वेरना चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध (New Hyundai verna variants)

ह्युंदाई वेरना EX, S, SX, and SX(O) या चार व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल. नवीन ह्युंदाई वेरनाला पेट्रोल इंजिन असेल डिझेल इंजिनचा पर्याय कंपनीने ठेवला नाही. नवीन वेरना गाडीमध्ये जुन्या मॉडेलच्या तुलनेत जास्त बूट स्पेस आणि कॅबिन रुम असेल. जवळचे डिलरशिप शोरुम किंवा ऑनलाइन ग्राहक गाडी बुक करू शकतात.