Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

BMW Cars Launched: ब्रँड न्यू BMW i7, 7 Series कार भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

BMW Cars Launched

आघाडीची कार निर्मिती कंपनी BMW ने i7 आणि 7 Series ही कार भारतात नुकतीच लाँच केली आहे. या दोन्ही गाड्या आलिशान कार सेगमेंटमधील असून त्यांची किंमत कोटीच्या घरात आहे. या सेगमेंटमधील गाड्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणल्या आहेत.

आघाडीची कार निर्मिती कंपनी BMW कंपनीने BMW  i7 आणि 7 Series ही कार भारतात नुकतीच लाँच केली आहे. या दोन्ही गाड्या आलिशान कार सेगमेंटमधील असून त्यांची किंमत कोटीच्या घरात आहे. या सेगमेंटमधील गाड्या पेट्रोल आणि इलेक्ट्रिक या दोन व्हेरियंटमध्ये बाजारात आणल्या आहेत. दोन्ही गाड्यांची भारतातील एक्स शोरुम किंमत 1 कोटी 70 लाखांपासून पुढे आहे. या गाड्यांसाठी बुकिंग सुरू झाली असून मार्चमध्ये ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी मिळणार आहे.

बीएमडब्लू 7 Series गाडीची भारतातील एक्स शोरुम किंमत 1 कोटी 70 लाख रुपये असून या गाडीचे डिझेल व्हेरियंटही पुढील काही दिवसात येणार आहे. तर BMW i7 ही कंपनीची प्रमुख इलेक्ट्रिक कार असून या कारची किंमत 1 कोटी 95 लाखांच्या पुढे आहे. 7 Series गाडीची निर्मिती भारतातील चेन्नई येथील प्लांटमध्ये करण्यात येत आहे तर i7 या इलेक्ट्रिक कार परदेशातून आयात केली जाणार आहे.

BMW i7  फिचर्स

BMW i7  गाडीमध्ये दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. याचे एकत्रित पॉवर आउटपुट 536.4 bhp आहे आणि 745 Nm टॉर्क तयार करते. i7 ला 101.7 kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. गाडी एकदा चार्ज केल्यानंतर 625 किमी पर्यंत जाऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. बीएमडब्लूची ही गाडी मर्सिडीज-बेंझच्या EQS, Audi RS e-tron GT, Porsche Taycan इत्यादी गाड्यांना टक्कर देईल.

BMW 7 Series फिचर्स

BMW 7 Series गाडीला परदेशात जास्त फिचर्स देण्यात आले आहे. तथापि, भारतामध्ये 740i M स्पोर्ट प्रकारात 3.0-लीटर, इनलाइन-सहा-सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे ज्यातून 375.4 bhp आणि 520 Nm पीक टॉर्क मिळतो. इंजिन 8-स्पीड एटीशी जोडलेले आहे आणि त्याला BMW ची xDrive AWD प्रणाली देखील मिळते. BMW ची ही गाडी सेडान श्रेणीतील मर्सिडीज-बेंझ एस-क्लास, ऑडी A8 इत्यादींना टक्कर देईल.