आघाडीची वाहन निर्मिती कंपनी मारुती सुझुकीने दिल्लीतील ऑटो एक्स्पोमध्ये Jimny आणि Fronx या गाड्या लाँच केल्या आहेत. यातील फ्रॉन्क्स ही गाडी बलेनो गाडीच्या मॉडेलवर आधारित आहे. मात्र, या गाडीला बलेनोपेक्षा जास्त आकर्षक बनवण्यात आले आहे. Fronx SUV आणि Jimmy या गाड्या नेक्सा शोरुमध्ये एप्रिल महिन्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होतील. त्यासाठी बुकींगही सुरू झाले आहे.
Fronx कारबद्दल माहिती
Fronx या एसयुव्ही कारची भारतीय बाजारातील किंमत 8 लाख रुपयांपासून पुढे असण्याची शक्यता आहे. ही गाडी कॉम्पॅक्ट एसयुव्ही प्रकारात मोडते. गाडीच्या पुढील बाजूस NEXWave grille देण्यात आले आहे. साईड बॉडी क्लॅडिंग, ड्युअल फिनिश प्रिसिजन कट एलॉय व्हिल्सही, मागील बाजूस LED लॅम्प देण्यात आला आहे. गाडीच्या आतमधून डॅशबोर्डवर मेटल फिनिशिंग देण्यात आले आहे. ही गाडी बलेनोचे अपडेटेड व्हर्जन वाटते.
ग्राहकांना इंजिनचे दोन पर्याय देण्यात आले आहेत. स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.0L K-सिरीज टर्बो बूस्टरजेट डायरेक्ट इंजेक्शन इंजिन आणि 1.2L K-सिरीज ड्युअल जेट इंजिन देण्यात आले आहे. फ्रॉन्क्स टर्बो बूस्टरजेट इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि पॅडल शिफ्टर्ससह 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअर देण्यात आले आहेत. तर 1.2-लिटर के-सिरीज ड्युअल जेट इंजिन गाडीला आयडल स्टार्ट-स्टॉप बटन, 5-स्पीड मॅन्युअल गिअर देण्यात आले आहेत.
Jimny कारबद्दल माहिती
jimmy या मारुती सुझुकीच्या गाडीला पाच दरवाजे आहेत. या गाडीचेही बुकींग सुरू झाले असून ११ हजार रुपयांमध्ये नेक्सा शोरुममध्ये जाऊन तुम्ही गाडी बूक करू शकता. चार मीटर लांबीची ही गाडी असून सात रंगामध्ये उपलब्ध असणार आहे. गाडीच्या फ्रंटला पाच पार्टमध्ये ग्रील देण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने गाडीमध्ये सहा एअर बॅग्ज देण्यात आल्या आहेत. या गाडीमध्ये 1.5-लीटर K15B पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. जे 103bhp आणि 134Nm पीक टॉर्क निर्माण करते.