Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2000 Note: नोटबंदी झाली आणि झोमॅटोची डोकेदुखी वाढली, कॅश ऑन डिलेव्हरीला ग्राहक देतात 2000 ची नोट

2000 Note

2000 Note: दोन हजारांच्या नोटा नागरिकांना कोणत्याही बँकेत बदली करता येणार आहेत. यासाठी प्रत्येक दिवशी 20000 रुपयांची मर्यादा आहे. मात्र या चलनी नोटा आर्थिक व्यवहारासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध आहेत. यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी अडचण झाली आहे.

रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याची घोषणा शुक्रवारी 19 मे 2023 रोजी केली. मात्र 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 2000 रुपयांची नोट चलनात वैध राहणार आहे. यामुळे व्यावसायिकांची डोकेदुखी वाढली आहे. बँकेत जाऊन नोट बदलून घेण्याऐवजी 2000 रुपयांची नोट खर्च करण्याला नागरिकांची पसंती मिळत आहे. त्याचा फटका फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोला बसला आहे.

दोन हजारांच्या नोटा नागरिकांना कोणत्याही बँकेत बदली करता येणार आहेत. यासाठी प्रत्येक दिवशी 20000 रुपयांची मर्यादा आहे. मात्र या चलनी नोटा आर्थिक व्यवहारासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत वैध आहेत. यामुळे विविध क्षेत्रातील कंपन्यांसाठी अडचण झाली आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटोला मागील दोन दिवसांत याचा प्रत्यय आला आहे. झोमॅटोवर ऑनलाईन फूड मागवणाऱ्या ग्राहकांनी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याया स्वीकारुन 2000 रुपयांच्या नोटा खर्च केल्या आहेत.

झोमॅटोने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारपासूनच कंपनीकडे 2000 रुपयांच्या चलनी नोटांचे प्रमाण वाढले आहे. कंपनीला प्राप्त होणाऱ्या एकूण कॅशपैकी 72% कॅश ही 2000 रुपयांच्या नोटांतून ग्राहकांकडून प्राप्त होत असल्याचे झोमॅटोने म्हटले आहे.


ऑनलाईन खाद्यपदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांनी 2000 रुपयांची नोट खर्च करण्याला प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांत झोमॅटोकडे येणाऱ्या एकूण कॅशमध्ये 2000 रुपयांच्या नोटांचे प्रमाणे सर्वाधिक होते. यावरुन सोशल मिडियावर झोमॅटोचा मिम्स व्हायरल झाला आहे. ज्यात हजारो नेटिझन्सने लाईक्स केले आहेत.  

आरबीआयने 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 2016-17 मध्ये आरबीआयने 2000 रुपयांच्या 35,429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. त्यानंतरच्या वर्षात 1,115.07 कोटी आणि 2018-19 मध्ये फक्त 466.90 कोटी नोटा छापल्या होत्या.

मोदी सरकारने 2016 मध्ये जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करून त्याऐवजी नवीन 2000 रुपयांच्या नोट आणल्या होत्या. मागे काळा पैसा बाहेर काढण्याचा उद्देश होता. पण 2000 रुपयांची नोट आणूनही बनावट नोटांची संख्या वाढू लागली होती. त्यामुळे आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा हळुहळू बाजारातून कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची आज आरबीआयने अधिकृत घोषणा करत 30 सप्टेंबरपासून ही नोट चलनात असणार नाही.