Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Kisan Scheme : 14 लाख अपात्र शेतकऱ्यांची चलाखी; बनावट कागदपत्रांद्वारे 1754 कोटी लाटले

PM Kisan Scheme : 14 लाख अपात्र शेतकऱ्यांची चलाखी; बनावट कागदपत्रांद्वारे 1754 कोटी लाटले

राज्यातील 1 कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. मात्र आता या योजनेमध्ये जवळपास 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत हा निधी मिळवला असल्याचे समारे आले आहे.

केंद्र सरकारकडून ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना’ या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला 6000 रुपये आर्थिक मदत देण्यात येते. मात्र केंद्राच्या योजनेत काही लाभार्थी शेतकऱ्यांनी सरकारची फसवणूक करून नियमबाह्य पद्धतीने हा निधी मिळवला असल्याची माहिती समोर आली आहे. राज्यातील एकूण 14,28,000 हजार शेतकऱ्यांनी नियमबाह्यपणे PM kisan yojana चा निधी लाटला आहे. यामध्ये एकूण 1754 कोटी रुपयांचा निधी लाटला गेल्याची माहिती समोर आली आहे.


पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना (PM kisan yojana) या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. केंद्र सरकारकडून 4 महिन्यांतून एकदा असे 3 हप्त्यांमध्ये  2000 रुपये दिले जातात देते. हा निधी राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवलेल्या पात्र शेतकऱ्यांनाच दिला जातो. केंद्र सरकारकडून ही योजना सुरू झाली त्यावेळी राज्यातील 1 कोटी 17 लाख शेतकऱ्यांनी या योजनेसाठी नोंदणी केली होती. मात्र आता या योजनेमध्ये जवळपास 14 लाख 28 हजार शेतकऱ्यांनी खोटी कागदपत्रे सादर करत हा निधी मिळवला असल्याचे समारे आले आहे.

93 कोटी रुपये वसूल

दरम्यान, केंद्र सरकारकडून या संदर्भात राज्य सरकारला माहिती मिळताच राज्य सरकारकडून अशा पद्धतीने खोटी कागदपत्रे सादर करून निधी लाटणाऱ्यांकडून निधी वसूल करण्यात येत आहे. आतापर्यंत सरकारने राज्यातील 1 लाख शेतकऱ्यांकडून 93 कोटी रुपये रक्कम वसूल केली असल्याची माहिती राज्याच्या कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या संख्येत घट

केंद्र सरकारने या योजनेसाठी भूमी अभिलेख नोंदीप्रमाणे लाभार्थ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करणे, त्याच सोबत आधारकार्ड बँक खात्याशी लिंक करणे या नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली असता या योजनेत काही शेतकरी खोटी कागदपत्रे दाखल करून लाभ घेत असल्याची माहिती समोर आली त्यानंतर या लाभार्थ्यांच्या संख्येत घट आली आहे. केंद्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या 14 व्या हप्त्यासाठी राज्यातील केवळ 76 लाख 55हजार शेतकरी पात्र ठरले आहेत.

पात्रतेचे निकष

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी जो फक्त शेती करतो असाच शेतकरी पात्र आहे. भाडेतत्वावर शेती करणारा,तसेच सरकारी नोकरदार, किंवा एखाद्या शेतकऱ्याने प्राप्ती कर भरला असेल असा शेतकरी डॉक्टर, इंजिनीअर, सीए, वकील अशा व्यावसायिकांना या योजनेचा लाभ घेता येत नाही.तसेच जर एखाद्या व्यक्तीस निवृत्तीनंतर 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल तर तोही यासाठी अपात्र आहे.