Kia Seltos Facelift Model : किआ कंपनीला सेल्टोस फेसलिफ्ट मॉडेलसाठी 1,973 गाड्यांचे बुकिंग, बुकिंग कोड (के-कोड) द्वारे प्राप्त झाले आहे. Kia कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी K Code प्रोग्राम लाँच केला आहे. के कोड प्रोग्रामची खास गोष्ट म्हणजे त्याचा वापर करून ग्राहक आपली Kia कार बुक करू शकतो. तसेच, के कोड पध्दतीने बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या Kia Seltos फेसलिफ्ट कारची जलद डिलिव्हरी मिळणार आहे.
4 जुलैला झाले लाँच
दक्षिण कोरियन कंपनी किआचे सेल्टोस फेसलिफ्ट मॉडेल बाजारात येण्याची ग्राहकांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेरिस 4 जुलै रोजी कंपनीने Kia Seltos चे फेसलिफ्ट मॉडेल ग्राहकांकरीता लाँच केले. या कॉम्पॅक्ट एसयूव्ही कारचे बुकिंग 14 जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली होती.
इंजिनची वैशिष्ट्ये
Kia Seltos चे फेसलिफ्ट मॉडेल GT Line, Tech Line आणि X Line या तीन प्रकारांसह बाजारात सादर करण्यात आले आहे. गाडीच्या इंटीरियरवर विशेष लक्ष देत कंपनीने ड्युअल 10.25 इंच डिस्प्ले दिला आहे. याशिवाय व्हॉईस कंट्रोल पॅनोरमिक सनरूफ देण्यात आला आहे. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, यात 1.5 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 158 hp पॉवर आणि 253 Nm टॉर्क जनरेट करू शकते.
सुरक्षिततेसाठी प्रसिध्द मॉडेल
सेल्टोस फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सुरक्षिततेकडे प्रचंड लक्ष दिले गेले आहे. कंपनीने मॉडेलमध्ये 17 ऑटोनॉमस सेफ्टी आणि 15 पैसिव सेफ्टी फीचर्स प्रदान केली आहेत. सेल्टोस फेसलिफ्ट मॉडेल मध्ये ADAS लेव्हल 2 चे तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. ज्याची ऑटो मार्केटमध्ये खूप चर्चा आहे.