Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Gucci आणि Adidas ची 1 लाखाची निरुपयोगी छत्री

life style

फॅशन चा अग्रगण्य ब्रँड Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे.

छत्री म्हंटल की आपल्या डोळ्यासमोर येतो तो पाऊस. पावसाळा सुरु होणारच आहे. पावसाळा पूर्व खरेदी म्हणून आपण स्वस्तात स्वस्त अशी 250 पासून फार-फार 1000 रुपयांपर्यंत छत्री खरेदी करतो. अशातच Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas यांनी एक छत्री बाजारात आणली आहे. पण या छत्रीचा वैशिष्ट्य हे आहे की पावसाळ्यात या छत्रीचा उपयोग शून्य आहे. पण आता दोन प्रसिद्ध फॅशन ब्रँड्स एकत्र येऊन एक लाख रुपयांची अशी छत्री विकत आहेत. जी पावसाळ्यात काहीच कामाची नाही.

फॅशनच्या दुनियेत टॉप समजला जाणारा Gucci आणि स्पोर्ट्सवेअरचा आघाडीचा ब्रँड Adidas हे या छत्रीची विक्री करत आहेत. ही छत्री 11,100 युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 1 लाख 27 हजार रुपयांना विकली जात आहे. वीबो (Weibo) या चीनमधल्या सोशल मीडिया वेबसाइटवर सध्या या लाखो रुपयांच्या छत्रीची जोरदार चर्चा आहे. ही छत्री इटलीत (Italy) तयार करण्यात आली आहे. यात आठ काड्या आहे आणि त्या लाकडी हॅंडलला जोडण्यात आल्या आहेत. छत्रीला लूक येण्यासाठी हिरव्या आणि लाल रंगाचं जाळीदार कापड वापरण्यात आलं आहे. या छत्रीवर आदिदासचा लोगो आहे, तर खालच्या बाजूला हँडलवर Gucci चा लोगो लावण्यात आला आहे.

Gucci च्या वेबसाइटवरच्या माहितीनुसार, ही छत्री वॉटरप्रूफ (Waterproof) नाही. केवळ उन्हापासून संरक्षण मिळावं, या दृष्टिकोनातून ती तयार केली गेली आहे. ही छत्री पावसात निरुपयोगी ठरेल; मात्र उन्हात सावली देईल आणि फॅशन म्हणून वापरता येईल, असं या पोस्टमध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे. हे उत्पादन केवळ छत्री या श्रेणीत वर्गीकृत केलं असून त्याचा छत्रीचे काहीच गुण नाहीत. यामुळे हे दोन्ही ब्रँड्स चीनमध्ये विचित्र पद्धतीनं ट्रोल होत आहेत. 'जे ब्रँड्स वास्तववादी विचार करू शकत नाहीत, त्यांना पैसे का द्यायचे? यापेक्षा आपण स्थानिक वस्तूंचा वापर करू या', अशा प्रतिक्रिया चिनी नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.