आर्थिक वर्ष 2023मध्ये आतापर्यंत झोमॅटोसारख्या (New Age Consumer Technology) नव्या काळातल्या कंपन्यांच्या स्टॉकमध्ये चांगलीच तेजी आली आहे. 2022मध्ये या कंपन्यांच्या शेअरमध्ये चांगली विक्री झाली. झोमॅटो (Online Food Delivery) कंपनीची ईअर टू ईअर परफॉर्मन्सवर नजर टाकल्यास, कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना 39 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. मागच्या शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रानंतर झोमॅटोचा शेअर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (National stock exchange) 82.55 रुपयांवर बंद झाला. इकॉनॉमिक टाइम्सनं हे वृत्त दिलं आहे.
Table of contents [Show]
झोमॅटो कंपनीत वाढत आहे गुंतवणूक
जूनच्या आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंड ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोमध्ये त्यांची गुंतवणूक सातत्यानं वाढवत असताना दिसत आहे. मोतीलाल ओसवाल म्युच्युअल फंड आणि इन्वेस्को म्युच्युअल फंड यांच्यासारख्या मोठ्या कंपन्यांनी झोमॅटोमध्ये गुंतवणूक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, इन्वेस्को (Invesco) म्युच्युअल फंडानं झोमॅटोमध्ये 100 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले आहेत. असं मानलं जात आहे, की बाजारात सध्या असलेल्या 108 म्युच्युअल फंड स्कीममध्ये झोमॅटोच्या स्टॉकला होल्ड केलं गेलं आहे, हा एक विक्रमी उच्चांक मानला जात आहे.
तज्ज्ञांचं मत काय?
झोमॅटोच्या स्टॉकवर बोलताना, स्वतंत्र विश्लेषक मनीष शाह म्हणतात, की कोणताही गुंतवणूकदार हा स्टॉक 75 रुपयांच्या खाली स्टॉप लॉस ठेवून खरेदी करू शकतो. खरेदी केल्यानंतर, गुंतवणूकदार 100 रुपये आणि 125 रुपयांच्या वर स्टॉक पाहू शकतात.
तांत्रिक टिप्पणी
झोमॅटो स्टॉकच्या तांत्रिक गोष्टींवर भाष्य करताना, तज्ज्ञ शाह म्हणाले, की किंमत त्याच्या दीर्घकालीन ट्रिपल बॉटम ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्नमधून मोडत आहे. शेअरमध्ये मजबूत ट्रेंड रिव्हर्सल दिसून आलेला आहे.
झोमॅटोविषयी थोडक्यात...
झोमॅटो ही एक बहुराष्ट्रीय फूड डिलिव्हरी कंपनी आहे. ही कंपनी भारतीय असून दीपिंदर गोयल आणि पंकज चड्डा यांनी याची सुरुवात 2008 साली केली. प्रामुख्यानं ऑनलाइन फूड ऑर्डस स्वीकारणं आणि त्याची डिलिव्हरी करणं ही मुख्यत: कंपनीची कार्यपद्धती आहे. 1,000पेक्षा जास्त भारतीय शहरं आणि गावांमध्ये कंपनीचा विस्तार आहे. तर भारताबाहेरही कंपनीचा विस्तार झालेला आहे.