Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

ZHZB Box Office Collection: 10 दिवसात बॉक्स ऑफिसवर 'जरा हटके जरा बचके'ने केली इतक्या कोटींची कमाई

ZHZB BO Collection

Image Source : www.bollywoodlife.com

ZHZB Box Office Collection: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'जरा हटके जरा बचके' चित्रपट 2 जून 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन दहा दिवस झाले आहेत. या दहा दिवसात चित्रपटाने किती कमाई केली, जाणून घेऊयात.

बॉलिवूडचा रोमँटिक ड्रामा मुव्ही 'जरा हटके जरा बचके' 2 जून 2023 ला देशभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 10 दिवस झाले आहेत. चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या होत्या. असे असताना देखील रसिक प्रेक्षकांचे प्रेम चित्रपटाला मिळत आहे. लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) दिग्दर्शित या चित्रपटात अरिजित सिंग (Arijit Singh) यांनी गायलेले "फिर और  क्या चाहिए" हे गाणं सध्या सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे.

या चित्रपटात विकी कौशल आणि सारा अली खानने भूमिका साकारली आहे. लो बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. यानिमित्ताने 10 दिवसात चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवला, जाणून घेऊयात.

'जरा हटके जरा बचके'चे बजेट जाणून घ्या

लक्ष्मण उतेकर (Laxman Utekar) यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट एक लो बजेट फिल्म आहे. या चित्रपटाचे बजेट हे 40 कोटी रुपये इतके आहे. मात्र लो बजेट फिल्म असून देखील चित्रपटाच्या निर्मितीवर किंवा चित्रीकरणावर त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. नामांकित संगीतकार आणि कलाकारांनी यामध्ये काम केलेले आपल्याला पाहायला मिळत आहे.

10 दिवसात बॉक्स ऑफिसवर कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला

'जरा हटके जरा बचके' चित्रपटाला प्रेक्षकांचा पहिल्या दिवसापासूनच प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सारा आणि विक्री कौशलची जोडी सुपरहिट ठरत आहे. Addatoday या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने ओपनिंग डे ला शुक्रवारी 5.5 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. तर शनिवारी 7.2 कोटी रुपये आणि विकेंडला रविवारी 9.9 कोटी रुपये जमवले. त्यानंतर चित्रपटाच्या कमाईमध्ये शनिवार पर्यंत घट पाहायला मिळाली.

दुसऱ्या शनिवारी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 5.75 कोटी रुपायांचा गल्ला कमवला. तसेच विकेंड दिवशी म्हणजेच रविवारी चित्रपटाने 6.75 कोटी रुपयांची कमाई केली. दहा दिवसांच्या या काळात चित्रपटाने एकूण 53.28 कोटी रुपये कमवले आहेत. चित्रपटाच्या बजेटच्या तुलनेत ही कमाई 13.28 कोटी रुपयांनी जास्त आहे. अजूनही चित्रपट सिनेमागृहात चालत असून प्रेक्षकांचे त्याला प्रेम मिळत आहे.

चित्रपट सुपरहिट ठरण्यासाठी 'या' गोष्टीही कारणीभूत

जरा हटके जरा बचके चित्रपट 2 जून रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट ज्यावेळी प्रदर्शित झाला, त्या कालावधीत केरला स्टोरी हा एकमेव चित्रपट सिनेमागृहात चालत होता. असे असले तरीही केरला स्टोरीला सिनेमागृहात येऊन बराच काळ लोटला होता. या दरम्यान इतर कोणताही दर्जेदार चित्रपट सिनेमागृहात पाहायला मिळत नव्हता.

थोडक्यात लोकांपुढे पर्याय उपलब्ध नसल्याने जरा हटके जरा बचके चित्रपटाला त्याचा फायदा झाला. त्याशिवाय विकी आणि सारा पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करत आहेत. ही जोडी नक्की कशी आहे, हे जाणून घेण्यात लोकांना रस होता.

Source: abplive.com