Zerodha Investment: झिरोधा स्टॉक ब्रोकिंग कंपनीचे सह-संस्थापक निखिल कामत यांनी ब्लूस्टोन या ज्वेलरी ब्रँडमध्ये 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ब्लूस्टोनचे देशभरामध्ये 175 ज्वेलरी शॉप आहेत. पुढील काही वर्षात 500-600 ज्वेलरी शॉप उभारण्याचे उद्दिष्ट कंपनीने ठेवले आहे. झिरोधासोबतच झोमॅटोचे दिपिंदर गोयल, IIFL कंपनीनेही फंडिग राऊंडमध्ये सहभाग घेतला होता.
ब्लूस्टोन ज्वेलरी ब्रँड निधी उभारणीच्या शेवटच्या टप्प्यात असून 550 कोटी रुपयांची गरज कंपनीला आहे. (Bluestone jewellery brand) कंपनीचे मूल्यांकन 3,600 कोटींच्या जवळपास असल्याची माहिती समोर येत आहे.
ज्वेलरी ब्रँड्समध्ये तीव्र स्पर्धा
ब्लूस्टोन ज्वेलरी ब्रँड 2011 साली गौरव सिंग कुशावह यांनी सुरू केला होता. सुरुवातीला इ-कॉमर्स आणि ऑनलाइन ज्वेलरी विक्रीवर कंपनीने भर दिला होता. मात्र. आता प्रत्येक मोठ्या शहरात स्टोअर उभारण्यावर कंपनी भर देत आहेत. भारतात मोठ्या ज्वेलरी ब्रँडमध्ये तीव्र स्पर्धा सुरू असून हाय नेवटर्थ असणाऱ्या व्यक्ती आणि फॅमिली ऑफिसेस ज्वेलरी कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
मनिपाल ग्रुपचे चेअरमन रंजन पै आणि इन्फो एज ही कंपनीसुद्धा फंडिंग राऊंटमध्ये सहभागी झाली होती. प्रत्येकी 100 कोटी दोन्ही कंपन्यांनी ब्लूस्टोनमध्ये गुंतवले. ज्या कंपन्यांनी ब्लूस्टोनमध्ये आधीपासून गुंतवणूक केली होती. त्या कंपन्याही फंडिंगमध्ये सहभागी झाल्याचे कुशावह यांनी सांगितले.
नुकतेच टाटा ग्रुपमधील टायटन कंपनीने कॅरेटलेन या ज्वेलरी ब्रँडमधला मोठा हिस्सा विकत घेतला. या कंपनीचे मूल्यांकन सुमारे 200 कोटी डॉलर इतके आहे. या व्यवहारानंतर ब्लूस्टोनलाही निधी उभारणीसाठी चांगला प्रतिसाद मिळाला.
मल्टी चॅनल मार्केटिंग आणि सेल्स
ब्लूस्टोन कंपनीने याआधी हिरो ग्रुपचे प्रमुख सुनिल कांत मुंजाळ यांच्या फॅमिली ऑफिसकडून 30 मिलियन डॉलर निधी उभारला होता. यातून मोठ्या ज्वेलरी ब्रँडमध्ये गुंतवणुकीसाठी स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत आहे. ओमनीचैनल म्हणजेच ऑनलाइन ज्वेलरी वेबसाइट, इ-कॉमर्स, फिजिकल स्टोअर अशा विविध माध्यमांतून ग्राहकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न केले जातात.
छोट्या शहरातही येणार ब्लूस्टोनचे स्टोअर्स
भविष्यात ब्लूस्टोनचे देशभरात 500 ते 600 स्टोअर उभे राहतील. टायर 1 ते टायर -3 सारख्या शहरांमधूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. छोट्या-मोठ्या शहरांमध्येही कंपनीची ज्वेलरी स्टोअर उभी राहतील. नवीन स्टोअर उभारणी आणि टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंटसाठी निधी खर्च करण्यात येईल, असे कंपनीचे मालक कुशावह यांनी म्हटले.