विम्याची किमान गरज वाजवी दरात पूर्ण करणाऱ्या आणि मुदतपूर्तीवेळी ग्राहकाला प्रीमियम स्वरुपात भरलेली रक्कम परत देणाऱ्या योजनांना झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन म्हणतात. अर्थात एका ठराविक कालावधीनंतर ग्राहकाला या योजनेत प्रीमियम भरावा लागत नाही मात्र त्याची विमा सुरक्षा सुरुच राहते. अर्थात ज्यांना प्रीमियमची रक्कम परत मिळायला हवी असे वाटत असेल तर अशा ग्राहकांसाठी झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स चांगला पर्याय आहे.
विमा कंपनी पॉलिसीधारकाला एका विशिष्ट वयात मागणी केल्यावर संपूर्ण प्रीमियम रक्कम परत करते. दोन प्रकारच्या मुदत विमा योजना बाजारात उपलब्ध आहेत. एक नियमित टर्म प्लॅन आणि एक रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन आहे. एखाद्या व्यक्तीचा पॉलिसी कालावधीत मृत्यू झाला तर त्याच्या नॉमिनीला विमा भरपाई दिली जाते. टर्म प्लॅनचा आणखी एक प्रकार म्हणजे रिटर्न ऑफ प्रीमियम ज्यामध्ये पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत संपेपर्यंत प्रीमियम रक्कम परत मिळते.
Table of contents [Show]
रिटर्न ऑफ प्रीमियम योजना म्हणजे काय?
रिटर्न ऑफ प्रीमियम योजनेत नियमित टर्म प्लॅनच्या किंमतीपेक्षा जवळजवळ दुप्पट महाग आहेत. टर्म प्लॅन हा जगभरातील जीवन विम्याचा सर्वात स्वस्त आणि सर्वोत्तम प्रकार आहे. टर्म इन्शुरन्स त्यांच्यासाठी फायदेशीर आहे, परंतु त्यांना असे वाटते की त्यांना काहीही परत मिळणार नाही, म्हणून ते ही योजना खरेदी करत नाहीत. खासकरुन असे ग्राहक जे निवृत्ती काळात कुटुंबातील इतर सदस्यांवर अवलंबून राहू इच्छित नाहीत किंवा दीर्घ कालावधीच्या मुदत योजनांकडे प्राधान्य असणाऱ्या ग्राहकांसाठी कंपन्यांनी झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन बाजारात आणला आहे.
झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन
विम्याची गरज पूर्ण करण्यासाठी भारतात सर्वसाधारणपणे ग्राहकाला 70 वर्षापर्यंत आयुर्विमा संरक्षण देणारे टर्म पॉलिसी खरेदी करण्याचा पर्याय आहे. ग्राहकाने वयाच्या 55 व्या वर्षी आर्थिक गरजा पूर्ण केल्या असतील किंवा त्या पूर्ण करण्यासाठी पुरेसा निधी जमा केला असेल, तर त्याच्याकडे झीरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन निवडण्याचा पर्याय आहे.
झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करावा का?
रिटर्न ऑफ प्रीमियम योजनेचा विचार केला तर झिरो योजना ग्राहकांसाठी अधिक परवडणाऱ्या आहेत. रिटर्न ऑफ प्रीमियम (ROP) योजनांच्या तुलनेत साधारणपणे झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स जवळपास 50% ने स्वस्त आहे. झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स हे खासकरुन निवृत्तीनंतर किंवा वृद्धापकाळात इतरांवर अवलंबून राहायचे नाही, अशा व्यक्तींसाठी योग्य उत्पादन आहे.
झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅनचे फायदे
- झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स हा एका विशिष्ट कालावधीपुरता असतो.
- ही योजना व्यक्तिगत विमा योजना असून 99 वर्षापर्यंत विमा सरंक्षण देते.
- झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्ससोबत रेग्युलर टर्म प्लॅन आणि रिटर्न ऑफ प्रीमियम प्लॅन्सचे फायदे मिळतात.
- दोन्ही टर्म प्लॅन्सच्या तुलनेत झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स स्वस्त आहे.
- विमा प्रीमियमवर परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांसाठी झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन सर्वोत्तम आहे.
- ग्राहकाला त्याच्या निवडीनुसार एका ठराविक कालावधीनंतर प्रीमियम भरण्याची आवश्यकता नाही.
- जुन्या कर प्रणालीत झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्सवरील प्रीमियमवर वार्षिक 1.5 लाख रुपयांची कर सवलत आहे.
- पगारदारांसाठी हा एक चांगला विमा पर्याय आहे.