युट्यूब (Youtube) आता फक्त मनोरंजनाचे साधन न राहता कमाईचा एक स्रोत झाला आहे. युट्यूबवर योग्य व्हीडीओज कंटेंट (Video Content) पोस्ट केल्यास मासिक हजारो किंवा लाखोंची कमाई करतांना युट्यूबर्स आपल्याला दिसतात. युट्यूबरील व्हीडीओज (Youtube Video's) बघण्यात काही लोक आपला बहुंताश वेळ घालवतात. यामुळे तरुणांनी व्हीडीओ निर्मिती करुन युट्यूबला रोजगाराच्या दृष्टीने पसंती दाखवली आहे.
बिहार येथील तरुण हर्ष राजपूत याने युट्यूबच्या कमाईतून ५० लाखांची ऑडी कार खरेदी केली आहे. २७ वर्षीय हर्ष राजपूत (Harsh Rajput) कॉमेडी व्हीडीओ तयार करतो. त्याचे एकूण ३.५ मिलियन सबस्क्रायबर आहेत. त्यांचे अनेक लोक चाहते आहेत ते स्क्रिप्टेड व्हीडीओजच्या (Scripted Videos) माध्यमातून दर्शकांचे मनोरंजन करतात. नुकतीच त्याने ५० लाख रुपयांची ऑडी A4 ही करा खरेदी केली आहे.
युट्यूब कमाईतून फेडले कर्ज (Debt paid from YouTube earnings)
हर्षने युट्यूब मधून खूप मोठी कमाई केली आहे. यातून त्याने घराचा लिलाव होण्यापासून वाचवले व कर्जाची परतफेड केली. तो युट्यूबमधून माहीन्याला सुमारे ४.५ लाख रुपये कमावतो. कोट्यवधी लोक त्याच्या चॅनलला भेट देत असतात.
युट्यूबमधून अशी होते कमाई (This is how earn from YouTube)
ग्रामीण किंवा शहरी भागात अनेक तरुण युट्यूबसाठी पूर्णवेळ काम करतात यामुळे त्यांना चांगले
उत्पन्न देखील मिळते. युट्यूब चॅनल तयार करण्यासाठी योग्य विचार असणे गरजेचे आहे. युट्यूबवर
प्रभावीपणे काम करायचे असल्यास नियमित व्हीडीओ पोस्ट करणे गरजेचे आहे. यामुळे दर्शकांचे चॅनलशी
जोडले जाण्याचे प्रमाण वाढते.
युट्यूबमधून कमाईचे हे आहेत प्रमुख मार्ग (These are the main ways to earn from YouTube)
जाहीरात (YouTube Ads) –
जाहिरात हा युट्यूब मधील कमाईचा सर्वात प्रमुख मार्ग आहे. कमाईचा सर्वात मोठा भाग हा युट्यूब जाहिरातींमुळे मिळतो. व्हिडिओच्या सुरुवातीला किंवा मध्यभागी दिसणाऱ्या जाहिरातींमधून कंपनी मोठी कमाई करते. जी व्हीडीओ निर्मात्यांशी शेअर केली जाते.
शॉर्ट्स (YouTube Shorts) -
काही काळापूर्वी कंपनीने शॉर्ट्स लाँच केले आहे. अल्पावधीतच शॉर्ट्स लोकप्रिय होऊन व्हीडीओ निर्मात्यांना