बिझनेस तेव्हाच चालतो, जेव्हा त्या उत्पादनाची मागणी बाजारात असते. त्या दृष्टीने पाहाया गेलो तर टिश्यू पेपरच्या बिझनेसला मरण नाही. कारण, प्रत्येक ठिकाणी त्याची मागणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे उत्पादकांनी त्याची निर्मिती वाढवली आहे. आज बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे टिश्यू पेपर्स पाहायला मिळतात.
त्यामुळे तुम्ही बिझनेस करायच्या विचारात असल्यास एकदम कमी बजेटमध्ये तुम्ही महिन्याला लाखोंची कमाई करु शकता. कारण, हा व्यवसाय करायला जास्त भांडवलाची गरज नाही. तसेच, टिश्यू बनवायला कुशल कर्मचारी हवा असेही काही नाही. फक्त तुम्हाला जीव ओतून मार्केट रिसर्च करणे आवश्यक आहे. तसेच थोडी प्लॅनिंग ही गरजेची आहे. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.
Table of contents [Show]
उत्पादनासाठी आवश्यक बाबी
आता कोणताही बिझनेस सुरू करायचा म्हटल्यावर, तुम्हाला त्यासाठी जागेची आवश्यकता लागणार असते. तशीच या बिझनेसलाही जागा लागणार आहे. त्याचबरोबर आपल्याला कच्चा मालही लागणार आहे. कारण, छोटा बिझनेस असल्यामुळे काही बेसिक गोष्टी लागणारच आहेत. यातली जागा तर आपण शोधू शकतो.
मात्र, टिश्यू पेपरसाठी लागणारा कच्चा माल असा कुठेही मिळणार नाही. पण तुम्ही थोड सर्च केल्यावर तुम्हाला ऑनलाईन आणि ऑफलाईन कच्चा माल विकणारे किरकोळ विक्रेते आढळून येईल. बस तुम्ही त्यांच्याजवळून टिश्यू पेपरचा कच्चा रोल विकत घेऊ शकता. तुम्हाला तो थोडा फॅन्सी बनवायचा असल्यास, तुम्ही रंग ही खरेदी करु शकता.
गुंतवणुकीचा खर्च किती?
तुम्हाला टिश्यू पेपरचा बिझनेस सुरू करण्यासाठी जास्त खर्च लागणार नाही. फक्त तुम्हाला महत्वाच्या मशीन्स खरेदी कराव्या लागणार आहेत, त्या तुम्हाला जवळच्या विक्रेत्यापासूनही विकत घेता येतील. त्यामुळे छोटा टिश्यू पेपरचा बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला अंदाजे 2 लाख ते 5 लाखापर्यंत खर्च येऊ शकतो.
उत्पादनावर येणारा खर्च
तुम्ही टिश्यू पेपरची मशीन घेतल्यास तिच्यावरुन 8 तासांत 1500 पॅकेट्स (प्रत्येक पॅकेटमध्ये 100 पीस) बनवू शकणार आहात. त्यामुळे प्रत्येक टिश्यू पेपर्स पॅकेट बनवायला 11 ते 11.5 रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये मजूर, कच्चा माल आणि इलेक्ट्रीसीटीच्या खर्चाचा ही समावेश आहे.
मार्जिन किती असणार आहे?
ठोक बाजारात टिश्यू पेपर त्याच्या आकार आणि गुणवत्तेनुसार खरेदी केले जाते. त्यामुळे ठोक बाजारात त्यांची किंमत 13 ते 15 रुपयांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे तुम्हाला प्रति पॅकेट 2 रुपयांपर्यत मार्जिन मिळू शकते.
नफा किती मिळणार?
तुम्ही दिवसाला फक्त 1500 पॅकेट्स बनवले तरी महिन्याला त्याचा आकडा 45000 च्या जवळपास जाईल. त्यामुळे त्या 45000 पॅकेटला 2 रुपयाने गुणल्यास, तुम्हाला 90,000 रुपये मिळतील. त्यामुळे एकदम कमी खर्चात तुम्ही 90,000 रुपये कमवू शकता. तेच जर तुमचे उत्पादन वाढवले तर तुम्ही लाखो रुपये कमवू शकता.
आता तुम्हाला बिझनेसचा सर्व खर्च माहिती झाला आहे. तसेच, कच्चा माल कसा मिळेल, याचीही तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही शांत डोक्याने विचार करुन या बिझनेसचे प्लॅनिंग केल्यास, एकदम कमी वेळात तुम्ही चांगला नफा कमवू शकता.