Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Debit Card : डेबिट कार्ड घरीच विसरलाय? तरीही काढता येणार ATM मधून पैसे, जाणून घ्या सविस्तर

Debit Card : डेबिट कार्ड घरीच विसरलाय? तरीही काढता येणार ATM मधून पैसे, जाणून घ्या सविस्तर

Image Source : www.9news.com.au

घाई-घाईत एखाद्यावेळी तुमचे एटीएम कार्ड (ATM) म्हणजेच डेबिट कार्ड घरी विसरून राहिले, तरी तुम्हाला आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला महत्वाच्या कामासाठी कॅशची गरज भासल्यास, तुम्ही विना टेन्शन पैसे काढू शकता. फक्त यासाठी तुमचा मोबाईल नंबर तुमच्या खात्याला लिंक असणे गरजेचे आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या नेटबँकिंगद्वारे काही माहिती अपडेट करावी लागणार आहे.

Debit Card : आता सर्वच व्यवहार बऱ्यापैकी डिजिटली होत आहेत. त्यामुळे कॅशची तेवढी गरज पडत नाही. पण, एखाद्या ठिकाणी कॅशची गरज असली आणि एटीएम घरी राहिले, तर अडचण येऊ शकते. मात्र, यावरही आरबीआयने तोडगा काढला असून  एप्रिल 2022 मध्ये, सर्व बँकांच्या एटीएममधून कार्डलेस कॅश काढता येणार असल्याची घोषणा आरबीआयने केली आहे. तरी देखील बऱ्याच नागरिकांना ही सुविधा माहिती नसल्यामुळे, ते या गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाहीत. तसेच, या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकाजवळ डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे. तेव्हाच ते या सुविधेचा फायदा घेऊ शकणार आहेत. तसेच, त्यांना नेटबँकिंगद्वारे महत्वाची माहिती अपडेट करावी लागणार आहे.

विना डेबिट कार्ड एटीएममधून पैसे काढायच्या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमचे ज्या बॅकेत खाते आहे, त्या बॅंकेच्या नेटबँकिंगमध्ये लाॅग इन करा. त्यानंतर फंड ट्रान्सफरवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला Add a Payee पर्याय दिसेल.
  • तिथेच Adding a Beneficiary पर्यायावर क्लिक करा आणि नंतर कार्डलेस कॅश विड्राॅलची निवड करा.
  • कॅशलेस विड्राॅलची निवड केल्यानंतर Payee डिटेल्स टाका. जसे की, अकाउंट डिटेल्स इत्यादी.
  • सर्व डिटेल्स भरल्यानंतर ओटीपी पाठवा बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तुम्हाला ओटीपी मिळेल.
  • ओटीपी टाका. त्यानंतर 30 मिनिटांत तुमचे खाते सक्रिय होईल.
  • एटीएमवर गेल्यास  त्याच्या स्क्रीनवर  Cardless Cash पर्याय दिसेल, तो तुम्हाला निवडायचा आहे.
  • एटीएम स्क्रीनवर तुम्हाला ओटीपी, तुमचा मोबाईल नंबर, 9 अंकी आर्डर आयडी आणि जी रक्कम काढायची ती टाकावी लागणार आहे.
  • बँक एटीएमला डिटेल्स मान्य असल्यास, तुम्हाला त्वरित पैसे मिळतील.

अशा पद्धतीने तुम्ही विना डेबिट कार्ड एटीएममधून पैसे काढू शकता. फक्त त्या आधी तुम्हाला नेटबॅंकिंगद्वारे माहिती भरणे गजरेचे असणार आहे.

व्यवहाराची मर्यादा

रिझर्व बँकेने यासाठी काही नियम लागू केले आहेत. त्यामुळे कार्डलेस कॅश विड्राॅलद्वारे कमीतकमी 100 रुपयांपासून 10,000 रुपये प्रत्येक दिवशी व्यवहार करता येतो. तसेच तुम्ही एका महिन्यात कार्डलेस कॅश विड्राॅलद्वारे 25,000 रुपये काढू शकता. त्यामुळे ही सुविधा गरेजनुसार मर्यादित केली असल्याची दिसून येत आहे. तरी ज्यांना आर्थिक अडचण भासल्यास, ते पैसे काढण्यासाठी या पर्यायाचा वापर करू शकतात.