मोबाईल बँकिगमुळे आर्थिक व्यवहार सोपे आणि जलद झाले आहेत. त्यातच इंटरनेटची उपलब्धता आणि मोबाईलचा वाढलेला वापर यामुळे मोबाईल बँकिंगचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळेच बहुतांश बँकांकडून मोबाईल बँकिंग (Mobile Banking) ॲपची सुविधा सुरु करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे खासगी बँकिंग क्षेत्रात नावाजलेल्या येस (Yes Bank) या बँकेनेही त्यांचे आयरिस (IRIS) हे नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले आहे. जे ग्राहकांना 100 हुन अधिक सेवांचा लाभ प्रदान करते.
बँकेच्या प्रत्येक ग्राहकांसाठी 'आयरिश'-
Yes बँकेने आपल्या ग्राहकांसाठी सर्वसमावेशक असे आयरिस हे मोबाइल बँकिंगचे ॲप सुरू केले आहे. या अॅपच्या माध्यमातून बँकेच्या सर्व ग्राहकांना आता मोबाईलच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार पूर्ण करता येणार आहेत. हे ॲप तयार करताना बँकेने जुन्या आणि नव्या ग्राहकांच्या गरजा विचारात घेतल्या आहेत. या अॅपमध्ये बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, तसेच खातेदारांच्या माहितीच्या सुरक्षेच्या हेतून टू स्टेप व्हेरिफिकेशन यासारख्या फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
आयरिस मोबाईल ॲपची वैशिष्ट्ये
या मध्ये बँकेकडून 100 पेक्षा जास्त बँकिंग क्षेत्राशी निगडीत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामध्ये नवीन ग्राहकांना मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच बचत खाते उघडता येणार आहे. तसेच खातेदाराला क्रेडिट कार्डसाठी देखील या अॅपच्या माध्यमातून अर्ज दाखल करता येणार आहे. याशिवाय क्रेडिट कार्डवर बँकेकडून देण्यात आलेल्या विविध ऑफर्सची माहिती देखील अॅपच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. बँकेने या अॅपच्या माध्यमातून कर्जासाठी देखील अनेक सुविधा दिल्या आहेत. तसेच गुंतवणूक, विमा, ऑनलाईन शॉपिंग, यूपीआय इत्यादी पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध-
ग्राहकांना येस बँकेचे हे ॲप गुगल प्ले स्टोअर अथवा App Store वरून डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. ॲप डाऊनलोड केल्यानंतर खातेदारांना आपल्या खात्याचा तपशील टाकून अॅप लॉगिन करावे लागणार आहे.