Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Yes Bank FD Rates: 'एफडी'च्या व्याजदरात येस बँकेने केला बदल, जाणून घ्या नवे व्याजदर

Yes Bank FD rates change

Yes Bank FD Rates: येस बँकेने ठेवीदारांना आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने मुदत ठेवींवरील (FD Rates) व्याजदरात बदल केले आहेत. नव्या दरानुसार सर्वसामान्य नागरिकांना 7 % पर्यंत तर ज्येष्ठ नागरिकांना 7.75 % पर्यंत व्याजदर मिळणार आहेत. कमी जोखमीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मुदत ठेव हा एक चांगला पर्याय आहे.

देशातील खासगी क्षेत्रातील येस बँकेने (Yes Bank) ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आणि जास्तीत जास्त गुंतवणूक वाढवण्यासाठी एफडीवरील (FD Rates) व्याजदरात बदल केला आहे. बँकेने साधारण 7 दिवसापासून ते 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर ग्राहकांना उच्च व्याजदर दिला आहे. सर्वसामान्य नागरिकांना 3.25 % ते 7 % पर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून 3.75 % ते 7.75 % पर्यंत व्याजदर दिला जात आहे.

2 कोटींपेक्षा कमी रकमेच्या ठेवीवर ग्राहकांना नवे व्याजदर लागू केले जाणार आहेत. बँकेने वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार नवीन व्याजदर हा 2 मे 2023 पासून लागू झाला आहे. येस बँक कोणत्या कालावधीसाठी किती व्याजदर देत आहे, जाणून घेऊया.

yes-bank-interest-rate.jpg
Yes Bank New FD Rates 

7 दिवस ते 180 दिवसांमधील गुंतवणुकीवर मिळणार इतका व्याजदर

येस बँक ग्राहकांना 7 दिवस ते 14 दिवसांच्या एफडीवर 2.25 % व्याजदर देणार आहेत. तर 15 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 3.70 % व्याज मिळणार आहे. तसेच 46 दिवस ते 90 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 4.10 % व्याज आणि 91 दिवस ते 180 दिवसांच्या एफडीवर 4.75 % व्याजदर देण्यात येत आहे.

181 दिवस ते 36 महिन्यांसाठी मिळेल इतका व्याजदर

बँक 181 दिवस ते 271 दिवसांच्या एफडीवर ग्राहकांना 6 % व्याजदर दिला जात आहे. तर 271 दिवस ते 1 वर्षाच्या एफडीवरील गुंतवणुकीवर ग्राहकांना 6.25% व्याजदर देण्यात येत आहे. याशिवाय 1 वर्ष ते 18 महिन्यांच्या एफडीवरील गुंतवणुकीवर 7.50 % व्याज आणि 18 महिने ते 36 महिन्यांच्या एफडीवर 7.75% व्याजदर दिला जाणार आहे. 36 महिने ते 120 महिन्यांच्या कालावधीसाठी ग्राहकांना 7 % व्याजदर दिला जाणार आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 0. 50 % जास्त व्याजदर

येस बँकेने 2 मे 2023 पासून नवे व्याजदर लागू केले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना मिळणारा व्याजदर वर नमूद करण्यात आला आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना वरील कालावधीतील (7 दिवस ते 3 वर्षापेक्षा कमी) एफडीवरील गुंतवणुकीसाठी बँक 0. 50 % जास्त व्याजदर देणार आहे. 

Source: hindi.moneycontrol.com