शाओमी या लोकप्रीय मोबाईल कंपनीच्या Redmi 12 या सिरीजच्या मोबाईलला ग्राहकांनी खरेदीला उत्तम प्रतिसाद दिला आहे. कंपनीने RedMI-12 4G आणि 5G या सिरीजचे तब्बल 10 लाख मोबाईल युनिटची विक्री केली आहे. 1 ऑगस्ट 2023 मध्ये कंपनीने भारतात ही सिरीज लॉन्च केली होती. त्यानंतर 4 ऑगस्टपासून ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता.
1 मिलियन पेक्षा जास्त मोबाईलची विक्री
ऑगस्टमध्ये Redmi 12 ही सिरीज जेव्हा लॉन्च झाली त्याचवेळी कंपनीने 7 ऑगस्टपर्यंत 3 लाख युनिट विकले होते. यामाध्यमातून कंपनीने त्यावेळी तब्बल 3 अब्ज रुपयांचा व्यवसाय केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात कंपनीने आतापर्यंत 1 मिलियन पेक्षा जास्त मोबाईल विक्री करत एक मैलाचा टप्पा गाठला आहे. सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यात कंपनीने 10,00,000 मोबाईल विक्रीचा टप्पा गाठला आहे. शाओमीने आत्तापर्यंत भारतात Redmi 12 4G आणि Redmi 12 5G असे दोन्ही मिळून 10 लाखांपेक्षा जास्त फोनची विक्री कली आहे.
13,499 रुपयांमध्ये 5G स्मार्टफोन
शाओमीच्या Redmi 12 4G या (4GB+128GB) व्हेरिएंटच्या मोबाईलची किंमत ही 9,999/- आहे. तर 6GB+128GB या मोबाईलची किंमतही 11,499/- रुपये इतकी आहे. तसेच 5G मोबाईलच्या किंमती पाहिल्या असता 4GB+128GB व्हेरिएंटची किंमत 13,499/- इतकी आहे. तर 6GB+128GB या व्हेरियंटची किंमत 15,499/- आहे. हा मोबाईल ऑनलाईन खरेदीसाठी रेडमीच्या वेबसाईसह इतर इ कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.