चायना मोबाईल निर्माती कंपनी शाओमीने भारतात त्यांचा नवीन 'Xiaomi Pad 6' लॉन्च केला आहे. इतर कंपनीच्या पॅडच्या तुलनेत शाओमीने यामध्ये अनेक वेगेवगळे फीचर्स दिले आहेत. त्यासोबतच त्याची किंमत देखील सर्वसामान्य ग्राहकांना परवडणारी आहे. कंपनीने Xiaomi Pad 6 हा दोन वेगवेगळ्या स्टोरेज ऑप्शनसह उपलब्ध करून दिला आहे.
यापूर्वी चीनमध्ये कंपनीने हा पॅड लॉन्च केला होता. ज्याचे प्रो व्हेरियंट देखील काढले होते. या पॅडला मिळालेला उत्तम प्रतिसाद पाहून कंपनीने हा पॅड भारतात लॉन्च केला आहे. मात्र याचा प्रो व्हेरियंट अजून भारतात लॉन्च करण्यात आलेला नाही. Xiaomi Pad 6 मध्ये कोणते फीचर्स आहेत आणि त्यांची किंमत किती? जाणून घेऊयात.
फीचर्स जाणून घ्या
Xiaomi Pad 6 मध्ये 2.8k LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याची साईज 11 इंच इतकी आहे. जो 120hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या पॅडची स्क्रिन HDR10+ आणि Dolby Vision ला सपोर्ट करणारी आहे. याच्या स्किनला गोरिला ग्लास 3 ची सुरक्षा देण्यात आली आहे.
Xiaomi Pad 6 मध्ये Qualcomm Snapdragon 870 चिपसेट देण्यात आली आहे. सोबतच 8,440mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा पॅड चार्ज करण्यासाठी 33 वॉटचा चार्जर देण्यात आला आहे.
वापरकर्त्याला फोटोग्राफीसाठी यामध्ये 13MP चा बॅक कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा पॅड ग्राहकांना दोन वेगवेगळ्या रंगात खरेदी करता येणार आहे. यामध्ये मिस्ट ब्ल्यू (Mist Blue) आणि ग्रेफाईट ग्रे (Graphite Grey) हे दोन रंग उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
Xiaomi Pad 6 हा दोन वेगवेगळ्या स्टोरेजमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्यामध्ये पहिला पर्याय हा 6GB रॅम व 128 GB स्टोरेज असा देण्यात आला आहे. तर दुसरा पर्याय 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज अशा स्वरूपात उपलब्ध करून दिला आहे.
किंमत जाणून घ्या
Xiaomi Pad 6 च्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या पॅडसाठी ग्राहकांना 26,999 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज असणाऱ्या पॅडसाठी 28,999 रुपये मोजावे लागतील. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवरून (ICICI Bank credit card) या पॅडची खरेदी केली, तर तुम्हाला 3000 रुपयांचा त्वरित डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीने पॅडसोबत की-बोर्ड देखील लॉन्च केला आहे. ज्याची किंमत 4,999 रुपये आहे. तसेच स्मार्ट पेनसाठी ग्राहकांना 5,999 रुपये मोजावे लागतील.
'या' ठिकाणाहून खरेदी करा
Xiaomi Pad 6 ग्राहकांना 21 जून 2023 पासून खरेदी करता येणार आहे. हा पॅड ऑनलाईन रिटेल वेबसाईट अमेझॉन (Amazon), mi.com आणि शाओमीच्या रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येणार आहेत.
Source: livemint.com