Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Worst Performing Stock in 2022: निफ्टीमधील 'या' 8 शेअरने 2022 मध्ये गुंतवणूकदारांना कंगाल केले

Worst Performing Stock in 2022

Worst Performing Stock in 2022: शेअर मार्केटमध्ये 2022 मध्ये अनेक चढ उतार दिसून आले. या परिस्थितीत काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना जोरदार धक्का दिला. निफ्टी 100 मधील 8 शेअर्सनी गुंतवणूकदारांना झोप उडवली.

शेअर मार्केटमध्ये 2022 मध्ये चढ उतार असले तरी वर्षभरात सेन्सेक्स आणि निफ्टीने सरासरी 3% रिटर्न दिला. मात्र यातील काही शेअर्स मल्टीबॅगर ठरले तर काही शेअर्सनी गुंतवणूकदारांचे जबर नुकसान केले. निफ्टी 100 मधील 8 महत्वाच्या शेअर्समध्ये वर्षभरात झालेल्या प्रचंड घसरणीने गुंतवणूकदारांचे जवळपास दोन लाख कोटींचे नुकसान केले.

वर्ष 2022 मध्ये गुंतवणूकदारांनासाठी वाईट स्वप्न ठरलेल्या पेटीएमचा शेअर सर्वात चर्चेतली कंपनी ठरली. पेटीएमची पालक कंपनी असलेल्या वन 97 कम्युनिकेशन्सचा शेअर वर्ष 2022 मध्ये 60% हून अधिक कोसळला. या वर्षात  वन 97 कम्युनिकेशन्सचा शेअर 438.35 रुपयांची नीचांकी स्तर गाठला तर 1379.15 रुपयांचा 52 आठवड्यातील उच्चांक गाठला होता. गुंतवणूकदारांना कंगाल बनवण्यात झोमॅटोचा शेअरसुद्धा आघाडीवर राहिला. झोमॅटोचा शेअर वर्षभरात 57% नी घसरला. सध्या तो 60 रुपयांवर आहे. या शेअरने वर्षभरात 142.45 रुपयांचा उच्चांक आणि 40.60 रुपयांचा नीचांकी स्तर अनुभवला.

ग्लॅंड फार्माचा शेअर निफ्टी 100 मंचावर 52% कोसळला आहे. वर्ष 2022 मध्ये ग्लॅंड फार्माच्या शेअरने 1563.60 रुपयांची पातळी गाठली होती. तो यापूर्वी 4062.95 रुपयांच्या पातळीवर गेला होता. नायका या कंपनीने आयपीओमध्ये गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली असली तरी शेअरने मात्र वर्ष 2022 मध्ये अपेक्षाभंग केला. नायकाचा शेअर वर्षभरात 56% ने घसरला. तो बुधवारच्या सत्रात 28 डिसेंबर रोजी 150.50 रुपयांवर बंद झाला. त्याने यापूर्वी 139.40 रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता. समवर्धन मदरसन या शेअरने गुंतवणूकदारांना वर्ष 2022 मध्ये जोरदार झटका दिला. समवर्धन मदरसनचा शेअर 52%  ने घसरला. हा शेअर सध्या 74.35 रुपयांवर आहे. 

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांनी केली निराशा

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने देखील गुंतवणूदारांचे नुकसान केले. सरत्या वर्षात विप्रोचा शेअर 46% ने घसरला. बुधवारी विप्रोचा शेअर 387.75 रुपयांवर बंद झाला. वर्ष 2022 मध्ये विप्रोचा शेअरने 372.40 ते 726.40 रुपयांचा नीचांक आणि उच्चांक अनुभवला होता. आयटी क्षेत्रातील आणखी एक कंपनी टेक महिंद्राच्या शेअरमध्ये वर्ष 2022 मध्ये 43% घसरण झाल्याचे दिसून आले. टेक महिंद्राचा शेअर 1015 रुपयांपर्यंत खाली आला. एम्फासिस या कंपनीनेही गुंतवणूकदारांना वर्ष 2022 मध्ये रडकुंडीला आणले. एम्फासिसचा शेअर वर्ष 2022 मध्ये 43% ने घसरला. बुधवारच्या सत्रात हा शेअर 1940 रुपयांवर बंद झाला होता.