• 05 Feb, 2023 13:07

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World’s First Mobile Phone : पहिल्या वहिल्या मोबाईल फोनची किंमत किती होती माहीत आहे?

World First Mobile phone

Image Source : www.firstversions.com

World’s First Mobile Phone: जगातला पहिला मोबाईल फोन कधी बनला, कुणी बनवला, पहिल्या मॉडेलचं नाव काय होतं, फिचर काय होते आणि महत्त्वाचं म्हणजे किंमत काय होती…जाणून घ्यायचंय?

असं म्हणतात पहिल्या गोष्टीबद्दलचं कौतुक, आकर्षण हे वेगळंच असतं, त्यानंतर अनेक अपडेटेड गोष्टी आपण खरेदी करतो मात्र त्याची सर पहिल्या गोष्टीला येत नाही. आज आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असलेल्या मोबाईलचंच उदाहरण घ्या. तुम्हाला तुमच्या पहिल्या मोबाईलचं जितकं कौतुक, आकर्षण होतं ते त्यानंतर खरेदी केलेल्या कितीतरी फोनबद्दल वाटलं का? 

मोबाईल फोनमध्येही मागच्या वर्षांमध्ये भरपूर बदल झाले आहेत. आधीचा नोकियाचा वजनदार फोन ते आताचा टचस्क्रीन असलेला स्मार्ट फोन यामध्ये आकार आणि रंगाबरोबरच तंत्रज्ञानातही फरक झाला आहे. मोबाईल फोन आता स्मार्टफोन झाला आहे. पण, जगातला पहिला मोबाईल फोन कसा होता, तो कुणी बनवला, त्याच फिचर काय होते कधी विचार केलाय? 

आज जगभरातील वेगवेगळ्या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या दिवसागणिक वेगवेगळे फीचर्स अपडेट  करत आहेत. त्या तुलनेत पहिल्या मोबाईल फोनचं वैशिष्ट्यं हेच होतं की, तो कुठेही नेता येत होता. पण, त्याचा प्रत्यक्ष वापर सुरू व्हायला तब्बल एक दशक जावं लागलं. आणि त्याची किंमतही भारी होती. या पहिल्या मोबाईल फोनविषयी जाणून घेऊया…

‘हा’ आहे जगातला पहिला मोबाईल फोन

जगातील पहिल्या पोर्टेबल सेल फोन मोटोरोला(Motorola) कंपनीने 1973 साली बनवला. या फोनचे जनक म्हणून मोबाईल इंजिनिअर ‘मार्टिन कूपर(Martin Cooper)’ यांना ओळखले जाते. सध्या मार्टिन कूपर 93 वर्षाचे आहे. 1970 साली यांनी मोटोरोला ही कंपनी जॉईन केली आणि 3 एप्रिल 1973 साली त्यांनी 'Motorola DynaTAC 8000X' हा पहिला मोबाईल फोन बनवला. इलेक्ट्रॉनिक्स सेक्ट्ररमधील हा पहिला फोन घरात, कार्यालयात आणि शाळांमध्ये वापरण्यासाठी तयार करण्यात आला होता. या फोनला 21 सप्टेंबर 1983 रोजी यू.एस. फेडरल कम्युनिकेशन्स कमिशनकडून(FFC) विक्रीसाठी मान्यता मिळाली. म्हणजे दहा वर्षं हा फोन विक्रीशिवाय पडून होता!

Motorola DynaTAC 8000X मध्ये फीचर्स काय होते?

  • 'Motorola DynaTAC 8000X' या फोनचं वजन 28 औंस(ounces) म्हणजेच 790 ग्रॅम होतं 
  • हा फोन 10 इंच म्हणजेच साधारण 25 सेमी उंच होता. त्यावेळी या फोनला अँटेना देण्यात आला नव्हता
  • याशिवाय 30 फोन नंबर सेव्ह करण्याची सोय सुद्धा यामध्ये देण्यात आली होती
  • नंबर डायल करण्यासाठी किंवा रिकॉल करण्यासाठी एलईडी(LED)डिस्प्ले देण्यात आला होता, मात्र यामध्ये स्क्रीन देण्यात आली नव्हती 
  • विशेष म्हणजे यामध्ये 30 मिनिटांचा टॉकटाईम दिला जायचा, ज्याचा रिचार्ज करण्यासाठी 8 तासांचा  वेळ लागायचा
dynatac-8000x-the-first-model-of-motorola-cellphone-1984.jpg

मोबाईलच्या कीपॅडबद्दल काही मजेशीर गोष्टी 

'Motorola DynaTAC 8000X' या फोनवर देण्यात आलेली बटणं ही अतिशय मजेशीर होती. वरच्या बाजूला  नेहमीप्रमाणे आकडे दिलेले होते. तर खालील बटणं ही संगणकाच्या कीबोर्डसारखी होती. ही बटणं (शॉर्टकट्स) वापरून काही टेलिफोन सेवांचा लाभ सहज घेता येत होता. ज्यामध्ये Rcl म्हणजेच रिकॉल करण्यासाठी, Clr बटन जे क्लिअर करण्यासाठी, Snd हे बटन पाठवण्यासाठी, Sto हे बटन स्टोअर करण्यासाठी, Fcn हे बटन फंक्शनकरिता, Pwr हे बटन पॉवर चेक करण्यासाठी आणि फोन लॉक व आवाजाकरिताही दोन अतिरिक्त बटणं देण्यात आली होती. 
थोडक्यात काय तर, तो दिसायला जरी जुन्या कॉर्डलेस फोन सारखा असला तरीही हा मोबाईल कुठेही सोबत घेऊन जाता येत होतं. मोबाईल फोनमध्ये पहिली डिस्प्ले स्क्रीन सिमेन्सने 1985 मध्ये आणली. पण, तेव्हाही मोबाईल फोन सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचाच होता. त्याचा सर्रार वापर 1990च्या दशकात अमेरिकेत सुरू झाला. आणि मोबाईल फोन निदान तिथल्या श्रीमंतांच्या हातात दिसू लागला. म्हणून तर 1990 च्या दशकाला ‘टेलिफोन क्रांतीचं दशक’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं. 

Motorola DynaTAC 8000X ची किंमत किती होती?

'Motorola DynaTAC 8000X' हा पहिला फोन 1983 मध्ये अमेरिकेत विकला गेला होता. आज आपल्याला मोबाईल अगदी 5 हजारापासून पाहायला मिळतात, पण या पहिल्या मोबाईल फोनची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल. याची किंमत जवळपास 4 हजार डॉलर इतकी होती. सोप्या भाषेत समजून घ्यायचं तर सध्याच्या भारतीय चलनानुसार जवळपास 3.25 लाख रुपये या फोनसाठी मोजावे लागायचे.

Motorola DynaTAC 8000X फोनची जाहिरात कशी होती पाहा