Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Tourism Day 2023: आयुष्यात एकदा तरी भेट द्या; भारतातील टॉप 10 टुरिस्ट डेस्टिनेशन माहितीयेत का?

World Tourism Day 2023

प्रत्येकाचं एक ड्रीम टुरिस्ट डेस्टिनेशन असतं. मग ते परदेशातील असो की देशातील, तिथं जाण्यासाठी मन उताविळ होतं. आज जागतिक पर्यटन दिन आहे. मित्र, फॅमिली किंवा एकला चलो रे यापैकी तुम्हाला जे आवडतं ते ठरवा आणि भ्रमंती करा.

World Tourism Day 2023: प्रत्येकाचं एक ड्रीम टुरिस्ट डेस्टिनेशन असतं. मग ते परदेशातील असो की देशातील, तिथं जाण्यासाठी मन उताविळ होतं. आज जागतिक पर्यटन दिन आहे. मित्र, फॅमिली किंवा एकला चलो रे, तुम्हाला जे आवडतं ते ठरवा. तुमचं फेवरेट डेस्टिनेशन आजच बुकमार्क करून ठेवा. फिरायला जाण्यासाठी पैसे नसतील तर आतापासून सेव्हिंग सुरू करा. या लेखात पाहूया भारतातील टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन कोणते? 

गोवा 

नयनरम्य समुद्र किनारे, प्राचीन चर्चसाठी गोवा प्रसिद्ध आहे. मित्रांसोबत किंवा फॅमिली ट्रिपवर जाण्यासाठी अनेकजण गोव्याची निवड करतात. रोजच्या कामाच्या ताणातून शांतता पाहिजे असेल तर गोव्याला जाऊन तुम्ही चील होऊ शकता. नवीन वर्ष आणि ख्रिसमस जवळ येत आहे. तर आतापासून गोव्याच्या ट्रिपचं प्लॅन करा. ऐनवेळी गोवा प्लॅनिंग फिस्कटवणाऱ्या मित्राला आतापासूनच ताकीद द्या. अन् गोवा टुर सक्सेस करून दाखवा. गोव्याला फिरायला जाण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा बेस्ट टाइम पिरियड समजला जातो. तीन चार दिवसांची ट्रिप पुरेशी ठरू शकते.

goa-beach.png

गोव्यात कोणती ठिकाणे पाहता येतील?

पालोलेम बीच, दूधसागर धबधबा, अगुंडा फोर्ट, बाघा बीच, अंजुना बीच, कलंगुट बीच, श्री मंगेशा मंदीर, Immaculate Conception Church आणि यासोबत इतरही अनेक ठिकाणे गोव्यात फिरण्यासाठी आहेत. गोव्याला जाण्यासाठी ट्रेन, रेल्वे, बस असे अनेक पर्याय आहेत. गोव्यामध्ये स्कुटर भाड्याने घेऊन तुम्ही मनसोक्त फिरू शकता. तसेच किनाऱ्यावर सनबाथ घेत सुट्टीचा आनंद घ्या. 

आग्रा 

आग्रा नावं जेव्हा आपण ऐकतो तेव्हा ताजमहल आपसूक डोळ्यासमोर येत नाही, असं होऊच शकत नाही. प्रेमाचं प्रतिक असलेली वास्तू पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक या ठिकाणी येतात. आग्रा भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशनपैकी एक आहे. (must visit tourist destination in India) यमुना नदी काठावरील ताजमहल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आहे. उत्तरप्रदेशातील या शहरामध्ये अनेक ऐतिहासिक क्षणांची साक्ष देणाऱ्या वास्तू आहेत. मुघल काळातील कोरीव काम, इमारतीचं बांधकाम कधी पाहिलं नसेल तर आग्र्याला नक्की भेट द्या. 

agra-taj-mahal.png

दोन दिवसांमध्ये आग्र्यातील महत्त्वाची पर्यटन स्थळे पाहून होतील. आग्र्याचा किल्ला, जामा मशीद, सम्राट अकबराची कबर, मेहताब बाग, गुरुद्वारा गुरु का ताल, डॉल्फिन वॉटर पार्क, ताजमहल अशी ठिकाणे तुम्हाला पाहता येतील. बोटिंग, किनारी मार्केटमध्ये शॉपिंग, सुभाष बझार, TDI मॉल सोबतच रूचकर मुघलाई खाद्यपदार्थांचा स्वादही घेता येईल. 

राजस्थान 

राजेशाही थाट काय असतो हे जर तुम्हाला अनुभवायचे असेल तर राजस्थानातील उदयपूर, जोधपूर, जयपूर अशा शहरांना भेट द्या. राजेरजवाड्यांसोबतच थार वाळवंटातील गर्मीही तुम्हाला अनुभवायला मिळेल. स्थापत्य कला, सांस्कृतिक वारसा, राजेशाही परंपरा आणि वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांनी जीभेचे चोचले पुरे करता येतील. परदेशातील पर्यटकही राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात येतात. 

rajasthan-palace-desert.png

जयपुर, उदयपूर, जैसलमेर, जोधपूर, बिकानेर, माउंट अबू, चित्तोडगढ, रणथंबोर नॅशनल पार्क, सारिस्का टायगर रिझर्व्ह, केवलादेव नॅशनल पार्क यासह इतरही अनेक ठिकाणी आहेत. ज्यांना तुम्ही व्हिजिट करू शकता. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या संकेतस्थळावर राजस्थानबद्दल सविस्तर वाचायला मिळेल. 

दिल्ली 

शेकडो वर्षांपासून जे शहर सत्तेचं केंद्र राहिलं त्या शहरात ऐतिहासिक वास्तुंची मोठी संख्या आहे. दिल्लीमध्ये सुलतानशाही, मुघलशाही काळातील अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. सोबतच शॉपिंग बाजार, म्युझियम आहेत. उत्तर भारतीय खाद्यपदार्थही चाखता येतील. 

delhi-red-fort.png

लाल किल्ला, हुमायुन कबर, कुतूबमिनार, लोटस टेम्पल, अक्षरधाम मंदिर, पुराना किला, जंतरमंतर, नेहरुपार्क, चांदणी चौक, जनपथ मार्केट, कॅनॉट प्लेस, सरोजिनी नगर मार्केट, पराठा वाली गल्ली, दिल्ली हाट अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत. महात्मा गांधींची समाधी देखील दिल्लीत आहे. 

मुन्नार

संपूर्ण पश्चिम घाटच निसर्ग सौंदर्यानी नटलेला आहे. केरळमधील मुन्नार या निसर्गरम्य ठिकाणी जगभरातील पर्यटक येतात. हिरवेगार डोंगर, दऱ्या, घनदाट जंगल, धबधबे, नद्या, नॅशनल पार्क पाहायला मिळतील. एको पॉइंट, स्टॉप स्टेशन, अतुक्कड वॉटरफॉल, एर्नाकुलम नॅशनल पार्क, टाटा टी म्युझियम, पल्लीवासल फॉल्स, चिन्नार वाइल्डलाइन सॅन्युचरी, रोज गार्डन, चहाचे मळे पाहायला मिळतील.  

munnar-lake-1.png

मनाली 

विशाल हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या डून व्हॅलीतील भूप्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. हिमाचल प्रदेशातील कुलू व्हॅलीमध्ये मनाली शहर वसलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये सर्वाधिक पर्यटक मनालीला येतात. डोंगररांगा, मंदिरे, नद्या, घनदाट जंगलाची सफर करता येईल. जर तुम्हाला निसर्गरम्य ठिकाणी जायला आवडत असेल तर मनाली तुमच्या लिस्टमध्ये अॅड करा. मनू टेम्पल, हिडिंबा देवी मंदिर, जोगिनी धबधबा, तिबेटियन मंदिरे, नेहरू कुंड, हिमाचल कल्चरल म्युझियमसह इतरही अनेक पर्यटन स्थळे आहेत. 

manali-1.png

उटी 

तामिळनाडूतील उटी हे पर्यटनस्थळ देखील जगभरात प्रसिद्ध आहे. हनिमून डेस्टिनेशन म्हणूनही उटी प्रसिद्ध आहे. निलगिरी डोंगर रांगांतून निसर्गाचे सौंदर्य पाहायला मिळते. शांत आणि नयनरम्य ठिकाणी फिरायला तुम्हाला आवडत असेल तर उटीची निवड योग्य ठरेल. उटी बॉटॅनिकल गार्डन, रोज गार्डन, ज्वालामुखी तळे, दोडाबेट्टा शिखर, सेंट स्टिफन चर्च, थ्रेड गार्डन, कलहट्टी धबधबा, अनामलाई मंदिर, कॅथरिन धबधबा यासह अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहता येतील. 

ooty.png

सिक्किम 

ईशान्य भारतातील पूर्वेकडील हिमालय रांगांमध्ये सिक्किम राज्य वसले आहे. बर्फाळ डोंगररांगा आणि डोंगरदऱ्यांच्या हा प्रदेश पर्यटकांना आकर्षित करतो. इतर पर्यटन स्थळांपेक्षा सिक्किम हे जरा हटके आहे. हिमालयीन प्रदेशात अनेक तळे आहेत. घनदाट जंगल आणि विविध फुलांच्या प्रजातीही सिक्किममध्ये आहेत.     

sikkim.png

जम्मू काश्मिर 

हिमालय रागांमधील जम्मू काश्मीरबद्दल माहिती नाही असा एकही व्यक्ती सापडणार नाही. देशातील पर्यटकांसोबतच जगभरातील पर्यटक जम्मू काश्मिरला दरवर्षी लाखोंच्या संख्येने भेट देतात. पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, दोडा, अनंतनाग, अमरनाथ, दाचिगम राष्ट्रीय उद्यान, दल लेक, बेताब व्हॅलीसह इतरही अनेक पर्यटन स्थळे पाहता येतील. बर्फाळ प्रदेशात जाण्यासाठी पठारी भागात राहणाऱ्या किंवा दक्षिण भारतात राहणाऱ्या नागरिकांना कायमच उत्सुकता असते. त्यामुळे हिमालयातील थंडी एकदा अनुभवा.  

लेह लडाख 

साहसी पर्यटकांसाठी लेह लडाख ट्रिप एक पर्वणीच असते. समुद्रसपाटीपासून साडेतीन हजार फूट उंचीवर हे ठिकाण आहे. पँगॉग त्सो लेक, नुब्रा व्हॅली, खार्दुंगला पास, लेह पॅलेस, मॅनगेटिक हिल, हिम्स मोनास्ट्री त्सो मोरिरी लेक, झास्कर व्हॅली सारखी पर्यटन स्थळे आहेत. ट्रेकिंग, मोटारबाइक राइड, रिव्हर राफ्टिंग, कॅमल सफारी लेह लडाखमध्ये करता येईल. 

leh-ladakh-1.png