Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

World Cancer Day: कर्करोगावरील उपचाराला सरासरी किती खर्च येतो?

World Cancer Day

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1 कोटी व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू होते. भारतात 2020 साली सुमारे 13 लाख व्यक्तींचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल, पित्ताशय कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. सोबतच तोंड, मेंदू, मान आणि फुफ्फुसाच्या कॅन्सरचेही अनेक रुग्ण भारतात आढळतात. कॅन्सरवरील ट्रिटमेंटसाठी अंदाजे किती खर्च येतो ते पाहूया.

World Cancer Day: आज शनिवार 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन आहे. 2020 सालच्या एका अहवालानुसार भारतामध्ये दर सहा व्यक्तींपैकी 1 व्यक्तीचा मृत्यू कर्करोगाने होतो. भारतात आजही कर्करोगाबाबत पुरेशी जनजागृती नाही. जागतिक कॅन्सर दिनाचे औचित्य साधून याबाबत जगजागृती होऊ शकते. कर्करोग म्हणजे मृत्यूशी गाठ असा समज लोकांमध्ये पसरला आहे. मात्र, हा खरा नाही. पहिल्या टप्प्यात अचूक निदान आणि उपचार झाल्यानंतर कर्करोगातून रुग्ण पूर्णपणे बरे होऊ शकतात. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ म्हणजेच कर्करोग होय. मात्र, वेळीच निदान झाले तर रुग्ण लवकर बरा होऊ शकतो. 

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 1 कोटी व्यक्तींचा मृत्यू कर्करोगामुळे होते. 2018 साली भारतामध्ये साडेसात लाखांपेक्षा जास्त जणांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला. तर 2020 साली सुमारे 13 लाख जण दगावले. भारतात महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कॅन्सर), सर्व्हायकल (योनीमार्ग), पित्ताशय कॅन्सरचे प्रमाण जास्त आहे. तोंड, मेंदू, मान आणि फुफ्फसाच्या कॅन्सरचेही अनेक रुग्ण भारतात आढळतात.

कॅन्सर आजार किती गंभीर स्वरुपात शरीरात पसरला आहे हे ठरवण्याचे चार टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात जर कॅन्सरचे निदान झाले तर रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते. तसेच उपचाराचा खर्चही जास्त येत नाही. जर कुटुंबामध्ये कॅन्सर आजाराची काही हिस्ट्री असेल तर पूर्व निदान चाचण्या घेऊन लवकर उपचार करता येऊ शकतात. (cancer treatment cost)  आता कॅन्सरच्या उपचारासाठी सरासरी किती खर्च येतो ते पाहूया. हा खर्च अंदाजे असून शहर, आजाराचा प्रकार, सहव्याधी, रुग्णाचे वय यासह अनेक गोष्टींनुसार बदलू शकतो.  

डॉक्टरांची तपासणी फी - 
जनरल फिजिशियन - 500 ते 1000
आँकोलॉजिस्ट - 800 ते 3000

कॅन्सरच्या निदान चाचण्यांसाठी किती खर्च येऊ शकतो (अंदाजे)

रुग्णामध्ये कॅन्सरची काही लक्षणे आढळून आल्यास विविध चाचण्या कराव्या लागतात. स्तनांच्या कर्करोगाच्या निदानासाठी मॅमोग्राफी (mammography) करावी लागते. सर्व्हायकल कॅन्सर (योनी मार्गाजवळ होणारा कर्करोग) निदान करण्यासाठी pap test करावी लागते. तसेच कोलोनोस्कोपी, डर्मोस्कोपी, PSA (prostatespecifi c antigen) test (prostate) यासोबत इतर कॅन्सरच्या प्रकारानुसार चाचण्या कराव्या लागतात.

मॅमोग्राफीसाठी येणा खर्च - 1,000 ते 4,000 रुपये
Pap test साठी येणार खर्च : 500 ते 2,500 रुपये
कोलोनोस्कोपी Colonoscopy 500 ते 2,500 रुपये 
PSA चाचणी 500 ते 1,000 रुपये

बायोप्सीसाठी येणारा खर्च -

जर विविध चाचण्यांतून कर्करोगाचे निदान होत नसेल तर डॉक्टर बायोप्सी करतात. यामध्ये शरीरातील पेशीचा नमुना घेण्यात येतो. त्या पेशीमध्ये कर्करोगाची संबंधित पेशी आहेत का? याचा शोध घेतला जातो. कॅन्सरच्या प्रकारानुसार चाचणीची किंमत बदलते.

साधी बायोप्सी खर्च - 2 ते 4 हजार 
क्लिष्ट बायोप्सी - 8 ते 10 हजार रुपये खर्च 
एक्सरे- रेडिओलॉजी स्कॅन 
अल्ट्रासाऊंड टेस्ट साठी 500 रुपये खर्च
सीटी स्कॅन खर्च CT Scan cost - 1 हजार ते 15 हजार (शरीराच्या अवयवानुसार किंमतीत बदल) 
PET CT Scan: 5,000 ते 25,000
MRI साठी खर्च 5,000 ते 12,000
रक्ताशी संबंधित चाचण्यांसाठी 3 हजारापर्यंत खर्च येऊ शकतो. 

कॅन्सरच्या उपचारासाठी किती खर्च येतो? (Cancer treatment cost)

कर्करोगाच्या प्रकारानुसार सर्जरी, रेडिएशन, केमोथेरपी, इम्युनोथेरपी असे उपचार केले जातात.  उदाहरणार्थ पहिल्या टप्प्यातील कॅन्सरची गाठ सर्जरीने काढून टाकता येते. मात्र, कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला असल्यास रेडिएशन, केमोथेरपी आणि सर्जरी असे पर्याय वापरावे लागतात, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे.

विविध प्रकारच्या सर्जरीसाठी 1 लाख ते 7 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो

रेडिएशन थेरपी खर्च - शरीरातील कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्यासाठी हाय एनर्जी एक्स-रे चा मारा केला जातो.

कॅन्सरच्या टप्प्यानुसार ही थेरपी पाच ते नऊ आठवडे चालू शकते. आठवड्यातून पाच वेळा रेडिएशन केले जाऊ शकते.

रेडिएशनसाठी 2.5 लाख ते 22 लाखांपर्यंत खर्च येऊ शकतो.

केमोथेरपीसाठी सुमारे 8 लाख खर्च करण्यात येऊ शकतो. सहा ते दहा वेळा केमोथेरपी केली जाऊ शकते.

टार्गेटेड इम्युनोथेरपीसाठी पाच लाख ते 50 लाख रुपये खर्च येऊ शकतो.

तसेच उपचार झाल्यानंतर फॉलो अप टेस्ट साठी आणखी 10 ते 15 हजार रुपये खर्च येऊ शकतो.

सोबतच औषधे आणि रुग्णाचे मानसिक संतुलन ढासळले तर सायकॉलॉजिस्टची गरज पडू शकते. त्यासाठीही अतिरिक्त खर्च येईल.