iPhone SE 4: प्रत्येकाची इच्छा असते आपल्याकडे स्मार्टफोन असावा. पण अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही त्याचे सर्वात मुख्य कारण आहे किंमत. कमी किमतीचे स्मार्टफोन फार कमी आहेत. जगातील स्वस्त स्मार्टफोनसाठी भारत ही मोठी बाजारपेठ आहे. या पॅटर्नला अनुसरून अॅपलकडून iPhone SE चे नवीन मॉडेल लाँच केले जात होते. पण आता स्मार्टफोन कंपनीने अॅपल यूजर्सना मोठा झटका दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी iPhone SE 4 स्मार्टफोनचे स्वस्त मॉडेल लॉन्च करणार नाही. कंपनी गेल्या अनेक वर्षांपासून परवडणारे iPhone लाँच करत आहे. यामध्ये iPhone SE 3 स्मार्टफोनचा समावेश आहे.
iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही? (iPhone SE 4 not launching this year?)
Apple कंपनीकडून iPhone SE 3 बंद करण्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना आलेली नाही. Apple विश्लेषक मिंग ची कुओच्या रिपोर्टनुसार, iPhone SE 4 यावर्षी लॉन्च होणार नाही. रिपोर्टनुसार, Apple ने आपल्या पुरवठा साखळी भागीदाराला 2024 मध्ये iPhone SE लॉन्च न करण्याच्या योजनेबद्दल माहिती दिली आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या iPhone SE ला फारशी मागणी नव्हती.
Apple आपल्या पहिल्या इन-हाउस चिपसेटसह बजेट स्मार्टफोन लॉन्च करण्याची योजना आखत आहे, जो 4th जेनरेशनचा iPhone SE होता, अशी माहिती काही दिवसांपूर्वी मिळाली होती. पण आता Apple iPhone SE रद्द झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, Apple iPhone SE मध्ये Qualcomm 5G चिपसेटचा वापर सुरू ठेवता येईल. केवळ 2023 मध्येच नाही तर 2024 मध्ये Apple च्या आगामी स्मार्टफोन iPhone 16 मध्ये देखील Qualcomm चिपसेट वापरला जाणार आहे.