Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Zero Cost Term Insurance Plan: झिरो इन्शुरन्स प्लॅन का? कोणी? कधी? आणि कसा? खरेदी करायचा?

Zero Cost Term Insurance Plan

Zero Cost Term Insurance Plan: झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन हा पारंपरिक रेग्युलर टर्म प्लॅन आणि रिटर्न ऑफ प्रीमियम - टर्म प्लॅन (TROP) पेक्षा कसा वेगळा आहे, हे आपण जाणून घेणार आहोत.

सध्या इन्शुरन्स क्षेत्रातील नवीन टर्म लाइफ इन्शुरन्स प्लॅनच्या एन्ट्रीने BFSI अर्थात बँकिंग फायनान्शिअल सर्विसेस इन्शुरन्स कॉलम्स “क्लिक्स-अँड-व्ह्यूस” ने व्यापले आहेत. झिरो-कॉस्ट टर्म प्लॅन म्हणून ओळखला जाणारा हा नवीन टर्म प्लॅन, विविध इन्शुरन्स कंपन्यांनी यापूर्वी ऑफर केलेल्या इतर दोन टर्म प्लॅनपेक्षा काही नवीनतम फीचर्सने युक्त आहे. तथापि, हा प्लॅन पारंपरिक “रेग्युलर टर्म प्लॅन” आणि “रिटर्न ऑफ प्रीमियम - टर्म प्लॅन” (TROP) पेक्षा कसा वेगळा आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे.

रेग्युलर / प्युअर टर्म प्लॅनमध्ये, पॉलिसी ऍक्टिव्ह असताना पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पॉलिसीमध्ये नमूद केलेल्या नॉमिनीला "डेथ-क्लेम" रक्कम मिळते. याउलट, पॉलिसीधारकाने पॉलिसीचा कालावधी यशस्वीपणे पूर्ण केल्यास, कोणतीही परिपक्वता रक्कम (maturity amount) दिली जात नाही. TROP अंतर्गत, पॉलिसीधारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान मृत्यू झाल्यास नॉमिनीला इन्शुरन्सची रक्कम मिळतेच. आणि पॉलिसीधारकाने पॉलिसी टर्म पूर्ण केल्यास, त्याला भरलेल्या सर्व प्रीमियमची रक्कम (वस्तू आणि सेवा कर किंवा GST वगळता) परत मिळते.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन खरेदी करण्याचे फायदे

हा टर्म प्लॅन एकाच वेळी पारंपरिक टर्म प्लॅन-प्रमाणे लाईफ कव्हर तर देतोच आणि TROP अर्थात टर्म पूर्ण झाल्यावर प्रीमियम परत करणाऱ्या प्लॅन-प्रमाणे "रिटर्न ऑफ प्रीमियम" हे दोन्ही लाभ ऑफर करतो.

पॉलिसीधारकावर कोणतेही दायित्व (obligation) नसल्याने, पॉलिसीमध्ये नमूद केलेली किमान पॉलिसी टर्म पूर्ण केल्यावर, त्याला हवे तेव्हा पॉलिसी मधून बाहेर पडता येते. TROP प्लॅन्स प्रमाणे, पूर्ण पॉलिसी टर्म पूर्ण करायची गरज नसते, हे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य.

रेग्युलर टर्म प्लॅनच्या तुलनेमध्ये थोडा जास्त, मात्र TROP प्लॅन्सच्या तुलनेमध्ये तर खूपच कमी प्रीमियम आकारला जातो.

प्लॅन मधून बाहेर पडताना देखील भरलेले प्रीमिअम्स रिटर्न केले जात असल्याने, फारसे नुकसान न होता, लाईफ कव्हर एन्जॉय केलेले असते.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅनच्या मर्यादा

प्लॅन खरेदी करण्यासाठी पॉलिसीधारकासाठी सध्यातरी अधिकतम वयाची 45 वर्षे मर्यादा आहे. त्यामुळे 45 वर्षांपेक्षा  जास्त वय असणारी आणि "रिटर्न ऑफ प्रीमियम"साठी इच्छुक मध्यमवयीन व्यक्ती या प्लॅनचा लाभ घेण्यापासून अद्याप तरी वंचित आहे.

ही योजना नव्याने सादर करण्यात आल्याने, सध्या काही निवडक इन्शुरन्स कंपन्याच हे प्रॉडक्ट भारतात ऑफर करत आहेत.

ही योजना जरी "झिरो कॉस्ट" अर्थात "शून्य रक्कमेची" असल्याचे सांगतले जरी जात असले, तरी देखील प्रशासकीय शुल्क आणि कर अंतर्भूत असू शकतात, जे परत न करण्यायोग्य आहेत.

झिरो कॉस्ट टर्म प्लॅन का खरेदी करावा?

पॉलिसी-टर्म मध्ये पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला "सन्मानजनक आर्थिक  सुरक्षितता" असते.

आपण आपल्या टर्म पॉलिसीची मुदत आपल्या गरजा, बजेट, मार्केट मध्ये उपलब्ध असणाऱ्या भविष्यातील संधी तसेच पर्याय आणि तत्कालीन कारणे लक्षात घेऊन निश्चित करू शकतो.

TROP प्लॅन्स अर्थात टर्म पूर्ण झाल्यावर प्रीमियम परत करणाऱ्या इतर प्लॅन्सच्या तुलनेमध्ये ४०% ते ५०% इतका कमी प्रीमियम भरावा लागतो.

पॉलिसी शेवटपर्यंत सुरू ठेवण्याचा किंवा पॉलिसीमधून बाहेर पडण्याचा आणि प्रीमियम परत करण्याची विनंती करण्याचा पर्याय उपलब्ध असतो.

जर तुमची तब्येत चांगली असेल आणि तुमच्यावर कुटुंबाचे दायित्व फारसे नसेल, तर टर्म प्लॅनसाठी मासिक प्रीमियम भरण्यापेक्षा हा उत्तम पर्याय आहे.

झिरो कॉस्ट टर्म पॉलिसी हा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी (salaried employees) सर्वोत्तम पर्याय आहे.

ज्या कस्टमर्सना स्वतःच्या सेवानिवृत्तीच्या वयाबद्दल निश्चिती नसेल, त्यांनी हा प्लॅन खरेदी केलेला चांगला निर्णय असेल.

झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स खरेदी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  1. उत्पन्नाचा पुरावा
  2. ओळख पुरावा
  3. वैद्यकीय अहवाल
  4. वास्तव्याचा पुरावा

प्रमुख कंपन्यांचे झिरो कॉस्ट टर्म इन्शुरन्स प्लॅन्स

  • HDFC Life इन्शुरन्स कंपनीचा Click 2 Protect Super Plan
  • MAX Life कंपनीचा Smart Super Plus Plan
  • Bajaj Allianz ने आणलेला eTouch Plan
  • Canara HSBC यांच्या संयुक्त विद्यमाने iSelect Smart360 Plan
  • Aegon Life च iTerm Comfort Plan