Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Why Nokia Failed: एकेकाळी मोबाइल क्षेत्रात होता दबदबा; मात्र 'या' 5 कारणांमुळे नोकियाने गमावलं वैभव

how nokia declined

Image Source : www.history-computer.com

मोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकिया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले.

मोबाइल निर्मितीत दशकभरापूर्वी भारतीय बाजारपेठेत नोकीया (Nokia) या मोबाइल कंपनीची एक वेगळी ओळख होती. नोकियाचे मोबाइल दर्जेदार बनावट व उत्तम बॅटरीलाइफसाठी बाजारात प्रसिद्ध होते मात्र काही वर्षातच हे चित्र पालटले व नोकिया हे नाव भारतीय मोबाइल बाजार पेठेतून नामशेष झाले. 5 अशी कारणे ज्यांमुळे नोकिया बाजारपेठेत ठरले अयशस्वी.

1.फक्त हार्डवेअरवर लक्ष केले केंद्रित (Focusing only on hardware)

हार्डवेअरच्या बाबतीत नोकिया त्याच्या गुणवत्तेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र सॉफ्टवेअरचा विचार केल्यास Android व IOS ची लोकप्रियता नाकारता येणार नाही. नोकिया कंपनीला बाजारपेठेत पुनरागमन करण्यासाठी अँन्ड्रॉईडला स्वीकारणे गरजेचे होते. नोकियाने असे न करता मायक्रोसॉफ्ट सोबत जाणे पसंत केले. या निर्णयामुळे दोन्हीही दिग्गज कंपन्यांचे मोठे नुकसान झाले.

2. स्मार्टफोन लॉंच होण्यास झाला उशीर (The launch of smartphones has been delayed)

नोकिया फोन बाजारातून गायब होण्यामागचे कारण म्हणजे 3G नेटवर्क पाहता इतर कंपन्यांनी स्मार्टफोन लॉंच करायला सुरुवात केली. मात्र नोकियाने बदलत्या काळाचा स्वीकार केला नाही. नोकियाला 3G सह स्मार्टफोनची शक्ति समजली नाही.

3. सॅमसंगच्या स्मार्टफोनने नोकियाला टाकले मागे (Samsung smartphone overtakes Nokia)

सॅमसंगने 3G नेटवर्कचा फायदा घेत एकामागून एक स्मार्टफोनची मालिका लॉंच केली. नोकीया मात्र शांत राहीला. यामुळे सॅमसंगचे नशीब फळफळले सॅमसंगने अगदी कमी किमतीत स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल केले. नोकियाच्या जागी आता सॅमसंग कंपनीच्या रिंगटोनचा आवाज घराघरातून येऊ लागला.

4. मायक्रोसॉफ्टसोबतचा करार (Deal with Microsoft)

नोकियाच्या अपयशाचे आणखी एक कारण म्हणजे मायक्रोसॉफ्टसोबत चुकीचा करार. सॉफ्टवेअर कंपनी मायक्रोसॉफ्ट तोट्यात असतांना नोकियाने स्वतःला मायक्रोसॉफ्टला विकले. या कारारातून नोकियाला काहीही साध्य झाले नाही. नोकीयाने वेळोवेळी बदलत्या तंत्रज्ञानानुसार विकास केला नाही. मायक्रोसॉफ्टसोबत झालेला नोकीयाचा करार ही नोकियाची सर्वात मोठी चूक सिद्ध झाली.

5. ब्रॅंड व्हॅल्यूकडे केले दुर्लक्ष (Ignoring Brand Value)

नोकियाने त्याच्या ब्रॅंड व्हॅल्युला कमी लेखले. कंपनीला विश्वास होता की त्यांचे स्मार्टफोन उशिरा लॉंच होऊनही लोक स्टोअरमध्ये गर्दी करतील व नोकियाचे स्मार्टफोन खरेदी करतील. मात्र सॉफ्टवेअर सिस्टिममध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी याकडे नोकियाने फारसे लक्ष्य दिले नाही व त्यांचे बाजारमूल्य घटत गेले.